तणावमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालकांनी सज्ज व्हावे-विभागीय सचिव एम. एस. देसले
![]()
तणावमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालकांनी सज्ज व्हावे-विभागीय सचिव एम. एस. देसले
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी आणि तणाव मुक्त अशा वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाता यावं परीक्षक, केंद्र संचालक यांच्या परीक्षा कालावधीतील सहकार्याच्या अनुषंगाने केंद्रसंचालकांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन नाशिक विभागीय एसएससी आणि एचएससी बोर्डाचे सचिव एम. एस. देसले यांनी केंद्र संचालकाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले ते पुढे म्हणाले विद्यार्थी हा परीक्षेला सामोरे जाताना आनंदी आणि प्रसन्न वातावरणात असला पाहिजे त्या सोबतच परीक्षा घेणारी यंत्रणादेखील तणावमुक्त असणे आवश्यक असून आपल्या नियमावलीच्या अनुसार आपण कार्यतत्पर राहत कर्तव्य पूर्ती करावी आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासाला चालना द्यावी तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून गैरमार्गाचा अवलंब होणार नाही याबाबत देखील दक्षता घेण्यात यावी, परीक्षेदरम्यान वाटर बॉय राहणार नसून केंद्र संचालकांनी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देत, विद्यार्थ्यांना सोबत पाण्याची वॉटर बॅग आणण्याच्या संदर्भात सुद्धा सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्यात. बोर्डाचे सहसचिव एम. व्ही. कदम यांनी परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व केंद्र संचालक परीक्षकांना करावी लागणारी कामे यासंदर्भात माहिती दिली. केंद्र संचालकांच्या वतीने डॉ. मिलिंद बागुल यांनी परीक्षेदरम्यान असलेल्या काही बाबी मांडल्यात. विभागीय सचिवांनी शंका निरसन केले. सभेच्या सुरुवातीस जी. एच.रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. प्रीती अग्रवाल यांनी बोर्डाचे सचिव एम. एस. देसले व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. सभेस रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सोनल तिवारी, उपशिक्षणाधिकारी एफ. ए. पठाण, रागिणी चव्हाण, तालुका अध्यक्ष एस. एम. खंबायत,डॉ.मिलिंद बागुल विभागीय बोर्डाचे आर.बी. गोसावी, संजय बोरसे, शशिकांत चौधरी, मीनाक्षी पाटील विचार मंचावर उपस्थित होते.सभेस जळगाव जिल्ह्यातील दहावी व बारावी परीक्षा केंद्र संचालक उपस्थित होते. सभेचे संचालन अनिल सोनार यांनी तर आभार संदीप पाटील यांनी मानलेत. याप्रसंगी केंद्र संचालकांनी आपल्या काही शंका विभागीय सचिवांकडून निरसन करून घेतल्यात.




