1 min read

दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन कार्यशाळेत मिळाली यशाची गुरुकिल्ली!

Loading

दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन कार्यशाळेत मिळाली यशाची गुरुकिल्ली!

अमळनेरला सावित्रीबाई विद्यालयात “परीक्षेला जाता जाता..!” कार्यक्रम

अमळनेर- दहावीच्या विद्यार्थिनींना बोर्ड परीक्षेच्या अगोदर कार्यशाळेत मिळालेले मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवणारे आहे. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून परीक्षेचे तंत्र अवगत होऊन विद्यार्थिनींना यशाची गुरुकिल्ली प्राप्त होते, असे प्रतिपादन नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार यांनी केले.

येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांनी साठी झालेल्या “परीक्षेला जाता जाता…” या मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. प्राचार्य गायत्री भदाणे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विषय तज्ञ उमेश मनोरे, ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, डी बी वाल्हे, जी पी हडपे, दीपककुमार पाटील, एन बी खंडारे, नीलिमा पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य भदाणे म्हणाल्या की विद्यार्थिनींच्या बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या मनातील परीक्षा विषयीची भीती दूर होऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाता येते. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक कुमार पाटील यांनी आभार मानले. दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय कार्यशाळा हे आठ सत्रात पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी आपल्या मनातील अनेक प्रश्न उपस्थित केले त्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.

चौकट

या विषय तज्ञांचे मिळाले मार्गदर्शन …

इंग्रजी विषयासाठी उमेश मनोरे (जानवे), मराठी विषयासाठी मुकेश पाटील (अमळनेर), हिंदी विषयासाठी दिलीप पाटील (अमळनेर), बीजगणित विषयासाठी मुकेश सोनकुसरे (कळमसरे), भूमिती विषयासाठी एस ए बाविस्कर (अमळनेर), विज्ञान विषयासाठी निरंजन पेंढारे (वावडे), इतिहास विषयासाठी विलास चौधरी (अमळनेर), भूगोल विषयासाठी ए पी चव्हाण (निम), उमेश काटे (अमळनेर) यांचे मार्गदर्शन लाभले. अनेक विषय तज्ञ हे मॉडरेटर व पेपर तपासणीचा अनुभव असल्यामुळे बोर्ड परीक्षेत पेपर कसा सोडवावा याविषयीचे विविध तंत्र समजावून सांगितले.

अमळनेर- दहावी मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रशासकीय अधिकारी प्रा शाम पवार, प्राचार्य गायत्री भदाणे व उपस्थित शिक्षक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *