1 min read

देवगांव देवळी जिल्हा परिषद प्राथमिकव उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न….

Loading

देवगांव देवळी
जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न….

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा देवगाव देवळी तालुका अमळनेर येथे नुकताच बाल मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..
बाल मेळाव्याचे उद्घाटन गावातील जेष्ठ नागरिक व महात्मा फुले हायस्कूलचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब धर्मराज रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेतील दुसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी 35 स्टॉल लावले होते. यावेळी गावातील सरपंच सौ कल्पनाबाई चंद्रभान पाटील, उपसरपंच संदीप शिंदे व ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश देवचंद पाटील, उपाध्यक्ष आनंद बैसाणे ,
शाळेचे मुख्याध्यापक अरविंद प्रतापराव सोनवणे,सर्व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
बाल आनंद मेळाव्यात जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी हायस्कूलचे विद्यार्थी यांनी मनसोक्त आनंद घेतला..
बाल आनंद मेळावा प्रसंगी महात्मा फुले हायस्कूल येथील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बाल आनंद मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक सौ रेखा अरविंद सोनवणे ,राजेंद्र पाटील, जितेंद्र शेटे, रमेश पाटील, गायत्री पाटील, सौ कल्पना साळुंखे, भाऊसाहेब सोनवणे यांनी विशेष सहकार्य केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *