1 min read

बहिणाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन औचित्याने आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

Loading

बहिणाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन औचित्याने आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर
सतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोर संपन्न होत आहे.साहित्य संमेलनाच्या औचित्याने शिक्षकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थी सृजनशील कार्याचा गौरव करावा.पुरस्काराने सद्कार्य वर्धिष्णू होऊन समाजाभिमुख कार्य निरंतर चालावे या उद्दिष्टाने कृतज्ञतापूर्वक पुरस्कार देण्यात येत आहेत.साहित्य संमेलनाचे निमंत्रक डॉ.विलास नारखेडे व लिलाधर नारखेडे यांनी पुरस्कारांची घोषणा पुढील प्रमाणे जाहिर केली.
आदर्श शिक्षक पुरस्कार
१ ) ईश्वर रामदास महाजन [ महात्मा जोतिराव फुले हायस्कूल,देवगाव तालुका – अमळनेर ]
२ ) चतुर्भुज विनायक शिंदे [ कलाशिक्षक,आदर्श हायस्कूल आडगाव,ता.शहादा जि.नंदुरबार ]
३) प्रशांत पंढरीनाथ गुरव [ पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय,वडती तालुका – चोपडा ]
४ ) संजय श्रीकृष्ण चौधरी [ जि.प.शाळा,चिंचोली तालुका – यावल ]
५ ) प्राध्यापक रत्नाकर खंडू कोळी [ नूतन मराठा कॉलेज,जळगाव ]
६ ) योगिता सी.शिंपी [ मुख्याध्यापिका,डॉ.अविनाश आचार्य विद्यालय,जळगाव ]
७ ) धनश्री फालक [ मुख्याध्यापिका परशुराम विठ्ठल पाटील प्राथमिक शाळा,जळगाव ]
८ ) योगिता राहुल सोळुंके [ क्राफ्ट टिचर , इंग्लिश मेडियम स्कूल,जळगाव )
९ ) शिवाजी भास्कर शिंदे [ माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, पाचोरा ]
१० ) अशोक सोनू पारधे [ उपशिक्षक ,भगिरथ इंग्लिश स्कूल,जळगाव ]
आदर्श समाजसेवक पुरस्कार : –
१) राजकिशोर दुर्गेश तायडे,सत्यशोधक विधीकर्ते [ देवपूर धुळे ]
२ ) मनीषा टिकारामसिंग पाटील [ उपशिक्षिका,जि.प.शाळा वडधे,तालुका भडगाव ]
३ ) विद्या सुधाकर सोनार ,
[ समुपदेशक, समाज कल्याण विभाग समिती,जळगाव ]
४ ) आनंद सपकाळे [ उपशिक्षक,जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ ] ५ ) ॲडव्होकेट अरुण धांडे [ अध्यक्ष, चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघ जळगाव ]
६ ) सुरेश सिताराम अहिरे [ भुसावळ ]
७ ) एम.टी.लुले,जळगाव [ सचिव ,विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ,जळगाव ]
८ ) राजेंद्र देवराम कोळी [ अध्यक्ष,समाज चिंतामणी प्रतिष्ठान,जळगाव ]
९ ) प्रतिक्षा मनोज पाटील [ मुख्याध्यापिका,स्वामी समर्थ विद्यालय कुसूंबा ]
१०) सदाशिव नारायण सोनवणे [ जिल्हाध्यक्ष,म.रा.पेन्शनर असोसिएशन ]
पुरस्काराचे स्वरूप आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असून सदर पुरस्कार संमेलनाच्या समारोप सत्रात सन्मानपूर्वक देण्यात येतील.पुरस्कारार्थींनी प्रत्यक्ष हजर राहून साहित्य संमेलनाचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष तुषार वाघुळदे व विजय सुपडू लुल्हे तसेच आयोजक रघुनाथ राणे व डॉ.संजय पाटील यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *