1 min read

स्वप्नपुर्ती बहुउद्देशीय संस्था व HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Loading

स्वप्नपुर्ती बहुउद्देशीय संस्थाHCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन पाटण ता- शिंदखेडा, जि- धुळे येथे करण्यात आले होते. सध्याच्या काळात कॅन्सर चे प्रमाण महिलांन मध्ये जास्त प्रमाणात वाधले असल्याने व ग्रामीण भागातील महिलांना या विषयी जनजागृती न्हवती तसेच या टेस्ट ची फी ग्रामीण भागातील व्यक्तींना परवडणारी नसून हे सर्व बाबी लक्षात घेऊन सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या साठी नाशिक मानवता कॅन्सर हॉस्पिटल येथील डॉक्टर मेघना मॅडम,डॉक्टर सुप्रिया ठोंबरे , CSR Executive मनीषा चौधरी तसेच 3 नर्स आणि एक वॉर्ड मावशी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पाटण येथील प्रथम लोकनियुक्त सरपंचा सौ. अर्चना पवार ताई , उपसरपंच श्री. जयवंत पवार उपस्तीत होते. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, संथ सावता माळी, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून उदघाटन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात महिलांचे व पुरुषांचे BP , Sugar तपासण्यात आले. महिलांसाठी पॅम्प स्पियार, तोंडाची तपासणी, स्तन तपासणी, महिलांना येणाऱ्या गर्भाशयाचा रोगांची तपासणी ही मोफत करण्यात आली. यात पाटण गावातील 109 सदस्यांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच पाटण च्या सरपंचा यांनी या शिबिर आयोजन केल्या बद्दल स्वप्नपुर्ती संस्थे चे कौतुक केले व अशे विविध सामाजिक कार्यक्रम गावात घेत रहा ज्याने गावातील लोकांना आरोग्य बाबत जनजागृती होईल असे मत व्यक्त केले.आणि ज्या टेस्ट ची फी हजार रुपयात आहे ती मोफत इथे गावातच उपलब्ध करून दिल्याने गावातील नागरिकांनी शब्द सुमनाने संस्थेचे आभार मानले.याप्रसंगी स्वप्नपुर्ती संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र विश्वेश्वर , संस्थेचे उपाध्यक्ष चि. तेजस पाटकरी,संस्थेचे सचिव चि. दिपक विश्वेश्वर , सहसचिव चि. गणेश कुंभार व निशिगंधा पाटील , स्वप्नील पवार, अजय कोळी, घनश्याम पगारे, उमेश महाजन इत्यादी संस्थेतील सदस्य उपस्थित होते.गावातील नागरिकांनी तसेच ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतला. सोबत सहकारी टीम व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *