1 min read

आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड

Loading

आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड
अमळनेर प्रतिनिधी .. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विदयापीठ लोणेरे जि. रायगड येथे संपन्न होणाऱ्या २५ व्या क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धासाठी नामवंत प्रताप महाविदयालय अमळनेर चा अष्टपैलु गुणवंत खेळाडू धिरज संजय रोकडे यांची कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव संघाकडुन खो खो स्पर्धासाठी निवड झाली आहे.सदर स्पर्धा दि.३ ते ६ फेब्रुवारी २०२४दरम्यान होणार आहे.हा महोत्सव क्रीडा क्षैत्रातील महत्वाचा मानला जातो.
या खेळाडूस संस्थेचे कार्याध्यक्ष डाॕ.अनिलजी शिंदे , कार्यपाध्यक्ष श्री.प्रदीपभाऊ अग्रवाल ,प्राचार्य डाॕ.प्रा. ए बी जैन सर ,खा.शि.मंडळ सर्व संचालक मंडळ, महाविदयालयाचे क्रीडा संचालक प्रा. सचिन पाटील , प्रा. ए के अग्रवाल ,प्राध्यापक प्रतिनीधी प्रा.आर एम पारधी सर, डाॕ.प्रा.देवदत्त पाटील , डाॕ.प्रा.शैलेश पाटील सर, प्रा.संदिप नेरकर , प्रा. विजय तुंटे सर , मुख्याध्यापक बी एस पाटील सर , क्रीडा शिक्षक एस पी वाघ सर या सर्वानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.हा खेळाडू आतापर्यत दोन वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत खेळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *