1 min read

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव

Loading

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव

1) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दु:खद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मांडत आहे.
2) ग्रामीण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक ह्यांच्या अडचणी वाढत आहेत. यावर सरकारने परिणाकारक योजना कराव्यात, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक- डॉ. रवींद्र शोभणे, अनुमोदक- अशोक बेंडखळे
3) मराठीसह सर्व भारतीय भाषांची आकाशवाणी दिल्ली येथून प्रसारीत होणारी राष्ट्रीय वार्तापत्रे त्या-त्या राज्यांच्या राजधानीत पाठविण्यात आली. त्यामुळे त्या भाषांचे दिल्लीतील राष्ट्रीय स्थान संपुष्टात आले आहे. ही वार्तापत्रे पुन्हा दिल्लीहून प्रसारीत व्हावी, अशी मागणी हे संमेलन करीत आहे. सूचक- डॉ.श्रीपाद जोशी, अनुमोदक-प्रकाश पागे

4) गुजराथी, मराठी शब्दकोशाची आवृत्ती सुधारून परत तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक- संजय बच्छाव, अनुमोदक- शैलजा जोशी

5) बृह्नमहाराष्ट्रातील मराठी शिक्षण संस्थांना आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने एक रकमी अनुदान द्यावे, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक- गुरैय्या स्वामी, अनुमोदक- रमेश वंसकर
6)काळाच्या ओघात कान्हादेशाचे अपभ्रंश होऊन खान्देश असे नामकरण झाले आहे ते पूर्ववत कान्हादेश असे करण्यात यावे, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक- ॲड. पंकज गोरे
अनुमोदक- जगदीश देवपुरकर
7)अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे पूज्य साने गुरूजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने करावी, अशी मागणी संमेलन करीत आहे.
सूचक- डॉ. अविनाश जोशी, अनुमोदक- नीरज अग्रवाल
8) कान्हादेशाचे वैभव असलेल्या प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने करावी, अशी मागणी संमेलन करीत आहे.
सूचक- डॉ.धनंजय दीक्षित, अनुमोदक- डॉ.अविनाश जोशी
9) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक विचारवंतांनी पुरावे दिले आहेत आणि साहित्य संस्थांनी लोक चळवळ उभारून हा विषय ऐरणीवर आणला आहे, तरीही महाराष्ट्र शासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून त्याचा पाठपुरावा होताना दिसत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक- प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, अनुमोदक- प्रदीप दाते
10) जळगाव व धुळे जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणारे पाडळसे धरण केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट करून तसा प्रस्ताव केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट होणेसाठी महाराष्ट्र शासनाने त्वरीत पाठवावा, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक- नरेंद्र निकुंभ
अनुमोदक- अशोक बेंडखळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *