शिक्षक हा शैक्षणिक व्यवस्थेतला महत्वाचा केंद्रबिंदू.
आमदार किशोर दराडे
![]()

शिक्षक हा शैक्षणिक व्यवस्थेतला महत्वाचा केंद्रबिंदू.
आमदार किशोर दराडे
असोदा – भारतीय शिक्षण व्यवस्था आणि त्या शिक्षण व्यवस्थेला प्रगत, त्यासोबतच विकसनशील राष्ट्र बनविण्यासाठी नवनव्या पिढीला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असणारा शिक्षक हा व्यवस्थेतला महत्त्वाचा केंद्रबिंदू असून त्याला संरक्षित करणे हे शासन व्यवस्थेची जबाबदारी असल्याचे मत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कमळाकर सावदेकर होते. सुरवातीला सरस्वती पूजन,कवयित्री बहिणाबाई चौधरी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक किशोर कोल्हे,सुनील चौधरी,दिलीप महाजन,गोपाळ भोळे, वसंत चिरमाडे, गटशिक्षणाधिकारी खलील शेख, शिक्षक संघटनेचे संभाजी पाटील, भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे, रा.ना. लाठी भोकर विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.जे. न्हाळदे,आर.के लोखंडे, एम.डी.पाटील,प्रेम झंवर, पर्यवेक्षक एल. जे. पाटील मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते याप्रसंगी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल तसेच मार्गदर्शक शुभांगिनी महाजन यांना उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्कार 2023 हे सन्मान चिन्ह किशोर दराडे साहेबांच्या हस्ते देण्यात आले. प्रशांत कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी तर सूत्रसंचलन भावना चौधरी,संतोष कचरे यांनी आभार मानले. याप्रसंगी जी.आर.महाजन व राजू महाजन यांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा सत्कार केला. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक शिक्षकांना आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते देण्यात आले.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

