1 min read

ब्राह्मणवेल विद्यालयात चालते फिरते विज्ञान प्रदर्शन

Loading

ब्राह्मणवेल विद्यालयात चालते फिरते विज्ञान प्रदर्शन
साक्री तालुक्यातील माळमाथा विभागातील ब्राह्मणवेल येथील जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी संचलित कै .बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात , नेहरू सायन्स सेंटर मुंबईच्या वतीने तारे जमीन पर या टीमद्वारे चालते फिरते विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले . तारे जमीन पर ने आत्तापर्यंत देशभरात 23 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विज्ञान ‘खगोलशास्त्र ‘या विषयाबद्दल उपक्रम राबवून दिला आहे .नेहरू सायन्स सेंटर सोबतच्या या उपक्रमामुळे तीन राज्यांमधील सहा नवीन जिल्ह्यांमध्ये तारे जमीन पर कार्यरत झाली आहे .या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब तुकाराम माळी, संस्थेचे सचिव काकासाहेब एकनाथ महाजन ‘ यांच्या शुभहस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले .भारत सरकारच्या सांस्कृतिक नेहरू विज्ञान केंद्र मुंबई व तारे जमीन पर या टीमच्या वतीने विज्ञान प्रचार नव प्रसारासाठी विविध विज्ञान उपक्रमांचे आयोजन केले जाते . यावेळी इयत्ता ५ वि ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला . तसेच गावातील व परिसरातील विविध जि . प . शाळा आणि माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला . या प्रदर्शनीसाठी प्रथम संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने नेहरू विज्ञान केंद्राचे आणि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयाचे सायन्स टीचर श्री बळीराम विश्वास पाटील तसेच श्री पृथ्वीराज रवींद्र पाटील व मोटार वाहक श्री मिलिंद औंधकर यांचा शाल बुके व श्रीफळ देऊन सत्कार संस्थाध्यक्ष तुकाराम महाजन ‘ संस्थासचिव एकनाथ महाजन ‘ मुख्याध्यापक श्री गणेश महाजन ‘ आणि धुळे जिल्हा विज्ञान मंडळाचे सहसचिव श्री . काशिनाथ माळी श्री . बन्सिलाल माळी ‘ श्री . भाईदास कुवर ‘ श्री रविंद्र सुर्यवंशी प्रयोगशाळा परिचर श्री . बापू बोरसे पंडीत खैरनार ‘ सुनिल ठाकरे यांच्या शुभहस्ते बुके देवून सत्कार करण्यात आला . याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले .🌹💐🌹💐🌹💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *