राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत पुरूष गटात कोल्हापूर तर महिला गटात नागपूर संघ प्रथम
![]()
राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत पुरूष गटात कोल्हापूर तर महिला गटात नागपूर संघ प्रथम
कामगार भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ थाटात संपन्न

{पंजाबराव देशमुख}~~~~~~
गुरुकुंज/ मोझरी/अमरावती—
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा करवी पुरुष 28 वी तर महिला 18 वी राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचे आयोजन राष्ट्र संत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूर तर महिला गटात नागपूर संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत या विजयी संघाना राज्यस्तरीय पुरस्कार व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे तसेच राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सागता झाली.
या राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धा दि.29 व 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या संपूर्ण राज्यातून पुरुष व महिला एकूण 35 संघ सहभागी होऊन त्यामध्ये एकूण 420 भजन कलावंतानी आपला कलाविष्कार प्रगट केला तर आपल्या भजन साधनेने भजन रसिकांची मने जिकंली. या कामगार राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षिस समारंभ मोठया थाटाने आज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम,( मोझरी) येथे पार पडला.
या स्पर्धेत पुरुष गटात व्दितीय नायगांव गट तृतीय वरळी गट उत्तेजनार्थ प्रथम अमरावती गट व्दितीय सोलापूर गट तर उत्कृष्ट तबला-पखवाजक वादक प्रथम ज्ञानेश वगेळी ,कोल्हापूर गट व्दितीय मिलाजी पुणेकर, नागपूर गट तृतीय सुजल काडवे, नांयगाव गट उत्कृष्ट गायक प्रथम कृष्णा काडवे, नायगांव गट व्दितीय प्रमोद पोकळे, नायगांव गट तृतीय शत्रुघ्न आढाव, अकोला गट उत्कृष्ट पेटीवादक प्रथम प्रशांत घाडी, वरळी गट व्दितीय प्रविण कुरळकर, पुणे गट तृतीय चैतन्य कडस्कर, नागपूर गट , उत्कृष्ट तालसंच प्रथम नाशिक गट व्दितीय संभाजीनगर गट तृतीय नागपूर गट तर महिला गटात व्दितीय संभाजीनगर गट तृतीय चिपळूण गट उत्तेजनार्थ प्रथम ठाणे गट व्दितीय नांदेड गट तर उत्कृष्ट तबला-पखवाजक वादक प्रथम विजया इंगोले, संभाजी नगर गट व्दितीय भाग्यश्री शिंदे, वरळी गट उत्कृष्ट गायक प्रथम रश्मी कविश्वर, नागपूर गट व्दितीय लक्ष्मी थोरात, संभाजीनगर गट तृतीय शितल भोसले, ठाणे गट उत्कृष्ट पेटीवादक प्रथम भारती पाळेकर, चिपळूण गट व्दितीय जयश्री खतकर, ठाणे गट तृतीय स्वाती पंडित, सांगली गट, उत्कृष्ट तालसंच प्रथम सांगली गट व्दितीय नागपूर गट तृतीय ठाणे गट भजनी संघ कलावंताना पुरस्कार,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

