तीस वर्षानंतर जमला मित्रांचा सोहळा गेट-टुगेदर च्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा
![]()



तीस वर्षानंतर जमला मित्रांचा सोहळा गेट-टुगेदर च्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा
अमळनेर प्रतिनिधी-आज धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस माणसाला भेटायला तयार नाही परंतु सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल तीस वर्षानंतर सु.हि. मुंदडे हायस्कूल मारवड च्या इयत्ता दहावी सन 94- 95 व इयत्ता बारावी 96-97 च्या सर्व वर्गमित्र मैत्रिणी स्नेह मिलन सोहळा अर्थातच गेट-टुगेदर चा निमित्ताने एकत्र येऊन जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्याचा हा स्नेहमिलन सोहळा रविवारी सु. हि.मुंदडे हायस्कूल मारवडच्या प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य श्री एस. एम. पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री शांताराम बापू, श्री हरिभाऊ मारवडकर, जगदीश पाटील सर श्री ए डी पाटील सर, श्री बी. एस. पाटील सर, ए बी पाटील, विजय सूर्यवंशी, एल जे चौधरी ,गोविंद साळुंखे, सी वाय पाटील ,संजय साळुंखे ,राजेंद्र सोनवणे,विक्रम शिरसाठ, कांतीलाल पाटील व मान्यवर गुरुजन उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून गतकाळात व अकाली निधन झालेले – शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मारवड येथे पंचक्रोशीतील धार, गोवर्धन बोरगाव, बोहरा, मुडी, दरेंगाव, हिंगोना, करणखेडा, मालपूर भोरटेक, जैतपिर व परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात शिक्षणाच्या निमित्ताने त्यांची नाळ या शाळेशी व शाळेतील गुरुजन आणि मित्र-मैत्रिणीशी जुळते. शालेय जीवन हे खऱ्या अर्थाने वेगळे असते,तब्बल तीस वर्षानंतर शालेय मित्रांच्या भेटीची ओढ प्रत्येकाला होती. जीवनात सुख आणि दुःखामध्ये आपले मित्र-मैत्रिणीच आपल्याला आधार असतात म्हणून मैत्रीची नाळ आयुष्याच्या शेवटपर्यंत तुटू देऊ नका आयुष्यभर मैत्री जोपासा व एकमेकांना सुखदुःखात साथ द्या आणि जीवनाचा आनंद घ्या.असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून श्री एस. एम. पाटील यांनी केले. याप्रसंगी श्री A D. पाटील, ए .बी. पाटील, जगदीश साळुंखे सर ,लोटन चौधरी सर, गोविंद साळुंखे ,मनोहर पाटील, हरिभाऊ मारवडकर, या गुरुवर्यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रां-मैत्रिणींच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन जीवनातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .उपस्थित विद्यार्थ्यांपैकी महेंद्र पवार, महेंद्र जाधव,(हिंगोणा) नितीन मुंदडा शशिकांत पाटील (धार ) संतोष बोरसे (बोहरा),व प्रदीप चौधरी यांनी मनोगताद्वारे शाळेतील शिक्षकांची कडक शिस्त, अभ्यास, खेळ, मित्रांच्या गमती जमती या सर्व आठवणींना उजाळा दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पदांवर यश निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्वजण तीस वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनाच्या आठवणींमध्ये रममाण झाले तर काहींचं मन व डोळे भरून आले सायंकाळी सर्वांनी पुन्हा भेटूया च्या निर्धाराने या गुरुवर्यांचा आशिर्वाद व निरोप घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर चौधरी, सूत्रसंचलन ललिता पाटील व प्रदीप चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत साळुंखे यांनी केले वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश साळुंखे ,भरत पाटील , विनय साळुंखे, उमेश पाटील प्रदीप साळुंखे ,अरुण साळुंखे पुष्पांजली शिंदे मीना पाटील प्रदीप चौधरी ललिता पाटील स्वाती सिद्धपुरे भारती, शिंदे शशिकांत पाटील , वसंत सैंदाने व सर्व वर्ग मित्र-मैत्रिणी यांनी सहकार्य केले.

