1 min read

राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2022-23 प्रतापराव कौतिक पाटील यांना प्रदान

Loading

राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2022-23 प्रतापराव कौतिक पाटील यांना प्रदान करण्यात आला..
नाशिक येथील जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार माजी जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांना श्री. फ. मु. शिंदे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सासवड व श्रीमती वीरमाता बाळबाई सोनवणे यांच्या शुभहस्ते आणि ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे शनिवार रोजी प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो. “जेथे उणीव तेथे जाणीव” ठेवून स्वबळावर समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तींची संस्थेमार्फत निवड करण्यात येते. या निवडीबद्दल प्रतापराव पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *