1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी -दिनांक 29 /1/24 रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम .व श्री .आर .एम . देशमुख .यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक श्री .आप्पासो . गुणवंतराव गुलाबराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री प्राध्यापक . डॉ. एस . जे . शेख .व श्री .भास्कर बोरसे पत्रकार श्री .किरण पाटील व अध्यक्ष श्री हेमकांत पाटील .सचिव .श्री .संदीप दादा घोरपडे .मुख्याध्यापिका . श्रीमती . अनिता बोरसे मॅडम उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमती .बोरसे मॅडम म्हणाल्या की पारंपारिक खेळ लुप्त होत आहेत त्याकडे आजच्या विद्यार्थिनींचे दुर्लक्ष होत आहे त्या खेळांकडे विद्यार्थिनींना कसे वळवता येईल व त्यांचा शारीरिक व मानसिक बौद्धिक विकास कसा करता येईल तो प्रयत्न आम्ही पारंपारिक खेळ घेऊन करणार आहोत . आपल्या भाषणात डॉ. शेख . सर म्हणाले आजचे विद्यार्थी मैदानावर खेळत नाही म्हणून त्यांना जास्त वेळ बौद्धिक श्रम करता येत नाही . म्हणून तुम्ही रोज एक तास खेळा व मेहनत करा क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन माता – पालक सदस्य सौ भारतीताई सोनवणे यांनी केले त्यांच्यासोबत माता-पालक सदस्य सौ . योगिताताई ढोले व सौ गायत्री ताई पाटील उपस्थित होत्या.
विटी दांडू स्पर्धेचे उद्‌घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .आप्पासो गुणवंतराव पाटील व आबासो .श्री .भास्कर बोरसे यांनी विटी दांडू खेळून केले . लंगडी स्पर्धेचे उद्‌घाटन सर्व मान्यवरांनी लंगडी घालून केले सागर गोट्या स्पर्धेचे उद्‌घाटन . सचिव .दादासो श्री संदीप घोरपडे सर यांनी सागर – गोट्या खेळून केले तर फुगडी स्पर्धेचे उद्‌घाटन पालक संघ सदस्य सौ . भारतीताई सोनवणे सौ योगिता ढोले सौ .गायत्री पाटील मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम उपशिक्षिका सौ . मनिषा वैद्य . सौ . मोनाली वंजारी श्रीमती धनश्री वानखेडे क्रीडा शिक्षक श्री . आर . एम . देशमुख श्री .दीपक महाजन यांनी फुगडी घालून केले सोबत या खेळाचे पारंपारिक महत्त्व सांगितले सूत्रसंचलन श्री . आर . एम् . देशमुख व आभार श्री .मुकेश पाटील यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *