1 min read

मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक वाचनालये व शाळा-महाविद्यालयांना माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांचे आत्मचरित्र वाटप!

Loading

मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक वाचनालये व शाळा-महाविद्यालयांना माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांचे आत्मचरित्र वाटप!

निजामपूर-जैताणे (ता.साक्री) : उमविचे माजी कुलगुरू तथा जयहिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.के.बी.पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे येथील सार्वजनिक वाचनालये व शाळा-महाविद्यालयांना डॉ.पाटील यांचे “सुटलेली गणितं” हे आत्मचरित्रपर ग्रंथ नुकतेच वाटप करण्यात आले. खुडाणे चौफुलीवरील आदर्श कोचिंग क्लासेसच्या सभागृहात आयोजित ह्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे होते.

इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय महाजन, जेके शाह आदर्श महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.डॉ.अतिष मेश्राम, आदर्श विद्यामंदिराचे ग्रंथपाल प्रमोद राणे, जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयाचे खजिनदार श्यामभाई शाह, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल प्रमोद खैरनार, रामरावदादा पाटील आदिवासी आश्रमशाळेचे अधीक्षक संजय खैरनार, भानुबेन वाणी पब्लिक स्कुलचे शिक्षक प्रशांत सावळे, अँग्लो उर्दू स्कुलचे वरिष्ठ लिपिक साबीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांच्या हस्ते डॉ.के.बी.पाटील यांचे “सुटलेली गणितं” हे आत्मकथन मोफत वितरित करण्यात आले. पुणे येथील आर्ष पब्लिकेशनचे दिलीप चव्हाण यांनी ह्या आत्मकथेचे संपादन केले आहे.

सार्वजनिक वाचनालये, संस्था व शाळा-महाविद्यालयांना डॉ.के.बी.पाटील ह्यांची सुटलेली गणितं (आत्मचरित्र) व साक्षात शिक्षण (गौरवग्रंथ) ही दोन्ही पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन संपादक दिलीप चव्हाण यांनी दिले आहे. ज्येष्ठ शिक्षक संजय महाजन, अधीक्षक संजय खैरनार, ग्रंथपाल प्रमोद खैरनार ह्यांनी संस्थेच्या ग्रंथवाटप उपक्रमाचे विशेष कौतुक केले. मातोश्री सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे ह्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व आभार मानले. डॉ.के.बी.पाटील यांची संघर्षगाथा सर्वसामान्य गरीब, ग्रामीण, आदिवासी, अल्पसंख्य व बहुजन विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी असे आवाहन प्रा.जगदाळे ह्यांनी ह्यावेळी केले. संस्थेचे उपाध्यक्ष राजनारायण जगदाळे, सचिव सुशीलकुमार जगदाळे, खजिनदार जगदीश खैरनार, संचालक भारत जाधव, सागर जगदाळे, विशाल जगदाळे आदींनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *