“मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान अंतर्गत……पिंपळे आश्रम शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा”
![]()


“मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान अंतर्गत……पिंपळे आश्रम शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा”
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचालित सु.अ.पाटील प्राथ./यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु.ता अमळनेर जि.जळगाव येथे २६ जानेवारी २०२४ वार शुक्रवार रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमा अंतर्गत “माजी विद्यार्थ्यांचा मेळावा – सेतू ऋणानुबंधाचा” हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संस्थेचे सचिव मा.नानासो.युवराज पाटील साहेब,प्रमुख मार्गदर्शक व वक्ते प्रा.मा.श्री.अतुल सुर्यवंशी सर (English Set, Net परिक्षा उत्तीर्ण, यशदा, बार्टी, बालभारती येथे कार्य) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते यांचा सत्कार प्राथ.मुख्या.मा.श्री अविनाश अहिरे व माध्य.मुख्या.मा.श्री उदय पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती.माधुरी पाटील,श्री. प्रविण पाटील व श्री.रोहित नेरकर यांनी केले. माध्य.आश्रमशाळेचे मुख्या.श्री उदय पाटील यांनी प्रास्ताविक केले.संस्थेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण,वर्षभर राबविलेले शैक्षणिक उपक्रम,शैक्षणिक चर्चासत्र, प्रबोधनात्मक व्याखाने, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग,कृतीयुक्त अध्यापनाचे वर्ग,सुंदर माझा वर्ग उपक्रम,विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, क्रिडास्पर्धा, वाचन महोत्सव, सुंदर शाळा- बोलक्या भिंती,एक शिक्षक-पाच वृक्ष उपक्रम, वर्गग्रंथालय- पुस्तक मनाचे अन्न, जागतिक आदिवासी दिन साजरा करणे,आदिवासी संस्कृतीचे विविध कार्यक्रम,आदिवासी सण उत्सवात सहभाग असे विविध उपक्रम राबवून सातपुडा पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांच्या व्यक्तिमत्व व जीवनात परिवर्तन केले.संस्थेच्या अध्यक्षा माईसो.विद्याताई पाटील व संस्थेचे आधारस्तंभ नानासो. युवराज पाटील साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे प्रतिभावान व अष्टपैलू विद्यार्थी घडले. पिंपळे आश्रमशाळेचे विदयार्थी सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,आरोग्य,संरक्षण, बांधकाम,विज्ञान व तंत्रज्ञान, व्यापार व उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.
संस्थेच्या २५ वर्षाच्या कार्यकाळात इ. १०वी व इ.१२वी पर्यंत १४०० विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले त्यापैकी ७०० आदिवासी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.त्यामध्ये एमबीबीएस.,बीएएमएस., डिएचएमएस, डेन्टल कोर्सेस करून वैदयकिय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच BE Civil, BE Mechanical, BE Electrical, BE Computer ,महाराष्ट्र पोलीस,SRPF, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह ऋणानुबंधांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.सदर कार्यक्रमासाठी १४० माजी विद्यार्थी व १०० पालक वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमात चूनिलाल पावरा (MBBS) ,करणसिंग शिवाजी पावरा(BAMS, पुणे), आबा महादू पावरा (BAMS, नागपूर), सागर मालचे (Army जम्मू काश्मीर) यांनी व्यक्त केलेल्या भावना व्हिडिओद्वारे स्क्रीनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या.आश्रमशाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, मुल्ये आणि संस्कारांचे शिक्षण ,स्वावलंबी शिक्षण यामुळे आमचे व्यक्तिमत्व घडले अशा भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.तसेच आश्रमशाळेचे माजी विद्यार्थी प्रा.गोविंद चंद्रसिंग पावरा, प्रा.बासरा पावरा, शालीनी गावीत (सचिव, आदर्श संस्था नवापूर), होनक दत्तू गावीत (बँक मॅनेजर), सुकलाल फेंदा पावरा (सिव्हिल इंजिनीअर) यांनी आपल्या मनोगताव्दारे आश्रमशाळेच्या गतकाळातल्या आठवणी सांगितल्या. डोळ्यातून येणारे आनंदाश्रू, गहिवरलेली मने, आपुलकीच्या आणि स्नेहाच्या भावनांनी माजी विद्यार्थ्यांनी मंचावरील प्रमुख पाहुणे,अध्यक्ष व समोर बसलेले आदिवासी विदयार्थी यांच्या अंत:करणाला भावनिक साद घातली. शाळेत आलेल्या सर्व माजी विद्यार्थी व यशवंताना प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नानासो युवराज पाटील साहेब यांनी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करावा असे आवाहन मार्गदर्शनपर भाषणातून केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री.अतुल सूर्यवंशी सर यांनी विदयार्थ्यांना यशाची शिखरे गाठण्यासाठी इतिहास , संस्कृत मधील मार्मिक कथेतून मराठी,हिंदी,इंग्रजी,अहिराणी भाषेतून मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावि भाषण शैलीतून सुर्यवंशी सरांनी उपस्थितांची मने जिंकली. ज्ञानात्मक व बोधात्मक माहिती सांगितली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.सतीश कागणे यांनी केले.सदर कार्यक्रमाचे नियोजन मा.प्राथ व मा.माध्य. मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाने श्री.प्रविण पाटील,श्री.सतिष कागणे, श्री.सचिन पाटील,श्री मुकेश पवार,श्री संजू पवार यांच्या समितीमार्फत करण्यात आली होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लागले.

