देवगांव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक उत्साहात संपन्न
![]()




देवगांव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला… शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे जेष्ठ संचालक आण्णासाहेब धर्मराज पाटील यांनी केले…
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी उपस्थित गावातील सर्व बांधवांचे शब्दसुमनाने स्वागत केले… स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी संचलन केले..
शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी ध्वजगीत वर राज्य गीत सादर केले.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले…
यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच व सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन व सदस्य, पोलीस पाटील व विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,
शिक्षण प्रेमी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…




