1 min read

आहार, विहार मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

Loading

आहार, विहार मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त… ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
शिंदवणे: अन्न, अक्षर, आरोग्य व आचरण हे चार घटक मनुष्याचे जीवन घडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. निरोगी ,सशक्त व मानसिक दृष्ट्या परिपूर्ण असे शरीर पाहिजे असल्यास वरील बाबी आत्मसात करणे गरजेचे आहेत. अन्न व आरोग्य व्यवस्थित असल्यास मनुष्य देह शारीरिक दृष्ट्या विकार ग्रस्त होत नाही. बैठे काम ,व्यायामाचा अभाव ,अवेळी जेवण, रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, यामुळे शरीरातील इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिन तयार न होणे असे स्वादुपिंडात घडल्यामुळे मधुमेह होतो. यासाठी डाइट,व्यायाम म्हणजेच आहार, विहार मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असतो असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे संस्थापक विश्वस्त डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन यांनी येथे केले. संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय येथे मुख्यमंत्री ‘माझी सुंदर शाळा ‘या योजनेअंतर्गत देशातील मधुमेहांची वाढती समस्या या विषयावर जेष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आजार दुरुस्त करण्यापेक्षा मुळात विद्यार्थ्यांनी आजारीच पडू नये, हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन सर यांनी डॉ. रवींद्र भोळे यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक वर्ग ,शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *