1 min read

शिक्षकाला अपडेट राहण्यासाठी प्रशिक्षणाची गरज-शिक्षण विस्ताराधिकारी
कविता सुर्वे मँडम

Loading

शिक्षकाला अपडेट राहण्यासाठी प्रशिक्षणाची गरज-शिक्षण विस्ताराधिकारी
कविता सुर्वे मँडम

अमळनेरला अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन
प्रशिक्षण वर्ग उत्साहात सुरू…..

अमळनेर प्रतिनिधी
प्रशिक्षण सातत्यपूर्ण शिक्षणाचा एक भाग असतो.. खाजगीकरणाच्या स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर नवनवीन अपडेट आपण स्वीकारले पाहिजे.. प्रशिक्षणातून व्यवसायाला धार येते. सध्याचे युक तंत्रज्ञानाचे आहे…समोर अनेक आव्हाने आहेत त्या सर्व आव्हानांना आपल्याला सामोरे जायचे असेल तर शिक्षक बंधू भगिनींनी अपडेट राहणे गरजेचे आहे असे शिक्षण विस्तार अधिकारी सुर्वे मँडम यांनी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या माध्यमातून तालुकास्तरावरील प्रशिक्षणात प्रताप हायस्कूल अमळनेर येथे मार्गदर्शन करतांना बोलत होते..
अध्ययन प्रक्रीयेचे व्यवस्थापन व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे. मुलांना एकतर्फी शिकवण्यापेक्षा ती स्वतःहून शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती विकसित होईल. आव्हाने पेलण्यास, स्वीकारण्यास विद्यार्थी सक्षम बनतील व स्वतःहून शिकण्यास प्रेरित होतील, यादृष्टीने शिक्षकांनी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, यानुसार या प्रशिक्षणाची रचना केलेली आहे असे प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना केंद्रप्रमुख भगवान पाटील, चंद्रकांत साळुंखे ,शरद सोनवणे यांनी सांगितले..
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या माध्यमातून सुरू आहे. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व शिक्षणाविस्तराधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हे तालुकास्तरीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूल येथे दिनांक २३ जानेवारी २०२४ ते २९ जानेवारी२०२४ दरम्यान सुरू आहे.त्यात २१६ कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत.. त्यात जिल्हा परिषद, माध्यमिक,नपा,आश्रम कर्मचारी उपस्थित होते…इयत्ता सहावी ते आठवीचा प्रशिक्षण टप्पा आहे.सदर प्रशिक्षणासाठी
विषय तज्ञ देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, शिक्षक सुनील काटे ,महेंद्र रत्नपारखी, संगीता बाविस्कर ,अर्चना वाघ ,शोभा कसबे, सधन व्यक्ती राहुल चौधरी व सदर प्रशिक्षणाला सहकार्य अमोल पाटील, महेंद्र पाटील, सोनाली पिंगळे, रेखा वारडे शितल भदाणे सहकार्य करीत आहेत..
यावेळी प्रशिक्षणासाठी शिक्षक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

संध्याकाळी 5 वाजता प्रशिक्षण वर्गाला गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी भेट दिली..व प्रशिक्षण अत्यंत शिस्तबद्ध सुरू असल्याने पाटील यांनी समाधान व्यक्त केले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *