1 min read

धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जे के पाटील सर बिनविरोध !…

Loading

धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जे के पाटील सर बिनविरोध !…

प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगांव – जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब आर‌.डी.पाटील माध्यमिक शाळा पथराड येथील उपक्रमशील मुख्याध्यापक श्री जे.के.पाटील सर यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून अमळनेरचे मुख्याध्यापक श्री प्रकाश बी. पाटील होते. यावेळी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.श्री जे.के.पाटील हे बापूसाहेब आर डी पाटील माध्यमिक विद्यालय पथराड तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व धरणगाव तालुका शिक्षक संघाचे सदस्य आहेत. तसेच ते अनेक सामाजिक संघटनेत काम करीत होते. त्यांच्या निवडीने स्नेहीं मान्यवर व विविध शिक्षक संघटना यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसेच कार्यकाळात जास्तीतजास्त सर्वसमावेशक काम करणार असल्याचा मानस श्री जे के पाटील सर यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *