अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज-केद्रप्रमुख भगवान पाटील
![]()




अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज-केद्रप्रमुख भगवान पाटील
अमळनेर प्रतिनिधी
मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. याकरिता
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या माध्यमातून तालुकास्तरावरील प्रशिक्षणात प्रताप हायस्कूल अमळनेर येथे मार्गदर्शन करतांना केंद्र प्रमुख भगवान पाटील
बोलत होते..
अध्ययन प्रक्रीयेचे व्यवस्थापन व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे. मुलांना एकतर्फी शिकवण्यापेक्षा ती स्वतःहून शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती विकसित होईल. आव्हाने पेलण्यास, स्वीकारण्यास विद्यार्थी सक्षम बनतील व स्वतःहून शिकण्यास प्रेरित होतील, यादृष्टीने शिक्षकांनी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, यानुसार या प्रशिक्षणाची रचना केलेली आहे असे प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना केंद्रप्रमुख भगवान पाटील, चंद्रकांत साळुंखे ,शरद सोनवणे यांनी सांगितले..
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या माध्यमातून सुरू आहे. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व शिक्षणाविस्तराधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हे तालुकास्तरीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूल येथे दिनांक २३ जानेवारी २०२४ ते २९ जानेवारी२०२४ दरम्यान सुरू आहे.त्यात २१६ कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत.. त्यात जिल्हा परिषद, माध्यमिक,नपा,आश्रम कर्मचारी उपस्थित होते…इयत्ता सहावी ते आठवीचा प्रशिक्षण टप्पा आहे.सदर प्रशिक्षणासाठी
विषय तज्ञ देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, शिक्षक सुनील काटे ,महेंद्र रत्नपारखी, संगीता बाविस्कर ,अर्चना वाघ ,शोभा कसबे, सधन व्यक्ती राहुल चौधरी व सदर प्रशिक्षणाला सहकार्य अमोल पाटील, महेंद्र पाटील, सोनाली पिंगळे, रेखा वारडे शितल भदाणे सहकार्य करीत आहेत..
यावेळी प्रशिक्षणासाठी शिक्षक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

