1 min read

अमळनेरला संत गजानन महाराज
मंदिरात जागतिक पारायण दिवस…

Loading

अमळनेरला संत गजानन महाराज
मंदिरात जागतिक पारायण दिवस…

विजय ग्रंथाचे महीलांनी केले एकदिवसीय सामुहिक पारायण..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जगभरातील गजानन भक्त दरवर्षी जानेवारीचा पहीला किंवा दुसरा रविवार जागतिक पारायण दिवस म्हणून पाळतात. ह्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे एक दिवसीय पारायण – एक गुरु, एक दिवस, एक वेळ, एक साधना ह्या तत्वावर आधारित आहे.. दरवर्षी जागतिक पारायणामध्ये हजारो भक्त श्री गजानन विजय ग्रंथाचे संपूर्ण पारायण करतात.याचप्रमाणे अमळनेरला संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिवस साजरा करण्यात आला…
सविस्तर माहिती अशी कि अमळनेर येथील भाविकांचे श्रद्धास्थान जी. एम सोनारनगर येथील संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिवस साजरा करण्यात आला .सकाळी संत गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली.नंतर गजानन विजय ग्रंथाचे वाचन गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्त व महीला वारी प्रमुख ज्योतीताई राजेंद्र पवार व गजानन भक्त महीला यांनी केले.
यावेळी गजानन महाराज परिवारातील महिला मोठ्या संख्येने पारायणासाठी उपस्थित होत्या.. संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथांचे 21 अध्यायाचे ते वाचन करण्यासाठी मंत्रमुग्ध होऊन शांततेत वाचण्यासाठी बसलेले होते… नंतर गजानन विजय ग्रंथाच्या 21 अध्यायाचे वाचन झाल्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा एकत्रित लाभ घेतला…
यावेळी वारीप्रमुख सौ ज्योतीताई पवार, कल्याणी भावे,सरला पाटील, हिराबाई पाटील,इंदीरा येवले,कल्पना पाटील, रेवा पाटील, बबीता पवार, किर्ती शेलकर,वैशाली गोसावी, ज्योती महाजन,शर्मीला पाटील,प्रतिभा नेरकर,सुनिता पाटील, संगिता पाटील, मेघा शिंदे,नितल पाटील, विदया पाटील, चिऊ पाटील, सह गजानन भक्त महीला व
स्वप्नील पाटील, गजेंद्र पाटील, अशोक भावे,नितीन भावे,रघुनाथ पाटील, डॉ जिजाबराव पाटीलसह उपस्थित होते.

चौकट
सध्याच्या परिस्थितीत जिकडे तिकडे आपल्या मनात,समाजात, देशांतच नव्हे तर संपूर्ण विश्वात )अशांतता, दुःख, समस्या, संकटे पसरली आहेत. पैसा आहे, नाना प्रकारच्या सुख सुविधा आहेत पण मनाची शांतता नाही.ह्या सगळ्याच्या मुळाशी जावून बघितले तर आपल्या लक्षात येते की ह्या सगळ्यास माणुस स्वतःच जबाबदार आहे. धकाधकीचे
जीवन, जास्तीत जास्त पैसा कमावण्याची
लालसा यातच माणुस एवढा व्यस्त आहे की त्याला स्वतासाठी, परमार्थासाठी वेळच नाही. परन्तु आता वेळ आली आहे
स्वतःसाठी, समाज, देश व विश्वासाठी काही करण्याची. तरी आपण सर्व गजानन महाराज परीवारातील भगिनी
ह्या “जागतिक पारायण सोहळयात” हिरीरीने भाग घेवुन जागतिक पारायण दिवस यशस्वी केला..

सौ ज्योतीताई राजेंद्र पवार
महीला वारी प्रमुख अमळनेर
संत गजानन महाराज सेवा संस्थान अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *