पिंपळे आश्रम शाळेत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘या उपक्रमा अंतर्गत वकृत्व स्पर्धेचे आयोजन
![]()

पिंपळे आश्रम शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत वकृत्व स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या विशेष उपक्रमा अंतर्गत दि. 12 जाने 2024 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच (युवा दिन) याचे औचित्य साधून शैक्षणिक गुणवत्ता समिती मार्फत सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ही स्पर्धा दोन गटांमध्ये विभागण्यात आली पहिला गट म्हणजे लहान गट यामध्ये इयत्ता 5 वी ते 7 वी च्या एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यापैकी प्रथम क्रमांक 1) राणी प्रकाश पावरा तर द्वितीय क्रमांक 2) सोनू सुनील पावरा विद्यार्थिनींनी पटकावला तसेच मोठ्या गटात इयत्ता 8 वी ते 12 वी च्या एकूण 17 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी प्रथम क्रमांक 1) आसवंती भारमसिंग नाईक तर द्वितीय क्रमांक 2) दिनेश नमा पावरा या विद्यार्थ्याने पटकावला. सदर स्पर्धेसाठी लहान गट परीक्षक म्हणून श्री प्रविण पाटील सर व मोठा गट परीक्षक म्हणून गंगासागर वानखेडे यांनी कामकाज पाहिले, फलक लेखन श्री संजू पवार यांनी केले , या स्पर्धेच्या माध्यमातून वाचन कौशल्य विकसित होणे, विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी उंचावणे, आत्मविश्वास निर्माण होणे आणि विद्यार्थी स्पर्धात्मक युगामध्ये टिकला पाहिजे. इत्यादी गुणांवर भर देण्यात आला, यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव नानासो श्री युवराज पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

