1 min read

शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध
शिक्षक आमदार किशोर दराडे

Loading

शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध
शिक्षक आमदार किशोर दराडे
भावी पिढी घडवण्यासाठी आपल्या अध्यापनातून उत्तमोत्तम्म उपक्रम राबवत प्रयत्नशील राहणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून देशाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रगती साधण्यासाठी, प्रयत्नशील असणारा शिक्षक हा खरा समाजाचा आधारस्तंभ असून त्याच्या असणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेत त्यांना अशैक्षणिक कामे न देता अध्यापनावर अधिकाधिक भर कसा देता येईल यासंबंधीचे विचार नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते समारंभाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते.
शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बंकेतून होण्यासाठीचा शासनाचा आदेश निघेपर्यंत मी पाठपूरावा केला आहे. माझे वडील माजी आमदार डा.सुधीर तांबे यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्‍न सोडविले. मी ही शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, असे आश्‍वासन पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही दिना सारखा जनता दरबाराचे आयोजन करण्यात येऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार महोदयांच्या सहकार्याने प्रयत्न केले जाण्यासंदर्भात आश्वासन दिले. व विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांचा गुणवत्ता विकास अधिकाधिक होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची देखील त्यांनी याप्रसंगी आवाहन केले.
जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत केल्याबद्दल मान्यवरांच्या प्रती कृतज्ञता सोहळा व ‘दर्पणकार‘ पुरस्कार प्राप्त मान्यवर पत्रकारांचा सत्कार माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटन समन्वय समितीतर्फे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अल्पबचत भवनात कार्यक्रम झाला.
लोकसंघर्ष मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते आमदार सत्यजीत तांबे, शिक्षक आमदार किशोर दराडे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांचा सत्कार झाला. मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, प्रमुख पाहुणे होते.
समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या निर्मितीची कारणे, ध्येयधोरणांची माहिती दिली. दर्पणकार’ पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा यावेळी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.मिलिंद बागुल यांनी केले.
सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी केले. आभार शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वय समितीचे गोविंद पाटील प्रभाकर बोरसे सुनील वानखेडे पी.जी.कोल्हे, संतोष कचरे,सचिन जंगले,उत्तम चिंचाळे ,एल.जे.भुगवड्या, एस. के.राणे राजपूत, गिरीश नेमाडे, किशोर घुले, नाना पाटील, कृष्णराव विसावे, आर.डी. बोरसे, बि.डी.
शिरसाट, साहेबराव बागुल, एल.जे. पाटील, सुनिता पाटील , मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन, सिंधू मोरे, चारुलता टोके, विलास जोशी, अरविंद महाजन, भैय्यासाहेब देवरे,सुभाष न्हाळदे इत्यादींनी सहकार्य केले.अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *