1 min read

नीलिमा जाधव सन्मान कर्तुत्वाच्या पुरस्काराने सन्मानित

Loading

नीलिमा जाधव यांना सन्मान कर्तुत्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

आज दि.१२/०१/२०२४ रोजी अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे माँसाहेब जिजाऊंच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात सहकारी, महिला मंडळ,सामाजिक,शैक्षणिक ,वैद्यकीय, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा “सन्मान कार्य कर्तुत्वाचा पुरस्काराने” सन्मानित केले असता सौ.नीलिमा ऋषिकेश जाधव यांना दलित-मुस्लिम मागासवर्गीय समाजातील महिलांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी सक्रिय मदत मार्गदर्शन व सहकार्य तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगराध्यक्षा पुष्पलता ताई पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ह्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव मन्साराम पाटील (अध्यक्ष अमळनेर मराठा समाज), प्रमुख पाहुणे लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील ,तिलोत्तमा पाटील ,महिला मराठा महासंघाच्या शहराध्यक्ष स्वप्ना विक्रांत पाटील ,स्नेहा कुडचे पवार, राजश्री कल्याण पाटील तसेच विशेष अतिथी आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांतीबाई साळवी (शिंदे) होते तर सुप्रसिद्ध वक्त्या व व्याख्याता वैशालीताई डोळस यांचे व्याख्यान झाले ह्या प्रसंगी असंख्य महिलांची उपस्थिती विलोभनीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *