1 min read

कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करा,नाशिक विभागीय एस.एस.सी. बोर्डाचे सचिव मोहन देसले यांचे आवाहन

Loading

कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करा.
मोहन देसले
आपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी शिक्षण ही जीवनावश्यक गरज असून ती ती विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी नैतिक मूल्यांना अनुसरून शिक्षण देण्याच्या माध्यमातून कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रवृत्त करण्याचे आवाहन नाशिक विभागीय एस.एस.सी. बोर्डाचे सचिव मोहन देसले यांनी मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या संयुक्त सभेप्रसंगी केले, त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा संदर्भातील विविध अशा येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय या संदर्भात मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करत कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना केल्यात. सहाय्यक सचिव मंदाकिनी देवकर यांनी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्र, परीक्षा केंद्र, पर्यवेक्षक, नियामक या संदर्भातील योग्य त्या सूचना देऊन बोर्डाच्या परीक्षा ह्या शांततापूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पाडण्या संदर्भात सूचना केल्यात माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर यांनी कॉपीमुक्त परीक्षा संदर्भात मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांनी राबविलेले उपक्रम व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्यासंदर्भात आवाहन केले. उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना आपल्या केंद्रावर होणाऱ्या परीक्षा संदर्भात, नवीन केंद्र संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल व संभाजी पाटील यांनी केंद्र संचालकांना परीक्षेला येणाऱ्या अडचणी संदर्भात व प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासंदर्भात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भूमिका मांडली. कार्यक्रमास विभागीय मंडळाचे आर. बी. गोसावी, संजय बोरसे, शिक्षण विभागातील अधीक्षक रियाज तडवी, मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष जे.के. पाटील, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,राजेश कोरखडे,संजय खंबायत उपस्थित होते. प. न . लुंकड कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांनी मान्यवर अतिथींचे स्वागत केले. सूत्रसंचालन साहेबराव बागुल यांनी केले या संयुक्त सभेस जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *