1 min read

शिक्षक शिक्षकेतर संघटन
समन्वय समितीतर्फे उदया सत्कार समारंभ…

Loading

शिक्षक शिक्षकेतर संघटन
समन्वय समितीतर्फे आज सत्कार
जळगाव, ता.१२ – जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत केल्याबद्दल मान्यवरांच्या प्रती कृतज्ञता सोहळा व ‘दर्पणकार‘ पुरस्कार प्राप्त मान्यवर पत्रकारांचा सत्कार उद्या (ता.१३) माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर
संघटन समन्वय समितीतर्फे करण्यात येणार आहे. अल्पबचत भवनात दूपारी दोनला हा कार्यक्रम होईल.
लोकसंघर्ष मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्याहस्ते सत्कार होईल. मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन प्रमुख पाहुणे असतील. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे अध्यक्षस्थानी असतील.

सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे समनव्यक तुळशीराम सोनवणे, सह समन्वयक डॉ. मिलींद बागुल, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बोरसे आदींनी केले आहे.


चौकट..
यांचा होणार सत्कार..
शिक्षक आमदार किशोर दराडे, पदवीधर आमदार सत्यजित तांबे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर, वेतन पथक अधिक्षक

आर.एच. शर्मा, पत्रकार देविदास वाणी (सकाळ), विलास बारी (लोकमत), प्रदिप राजपूत (दिव्यमराठी), राजेंद्र पाटील (पुण्यनगरी), चंद्रशेखर नेवे (एबीपी माझा), सचिन गोसावी (दुरदर्शन), संतोष सोनवणे (मक्स महाराष्ट्र), आबा मकासरे (छायाचित्रकार).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *