मा का दिशाबोध, बेटी की उडान या विषयावर तेरापंथ महिला मंडळ तर्फे चर्चासत्र आयोजन
![]()

मा का दिशाबोध, बेटी की उडान या विषयावर तेरापंथ महिला मंडळ तर्फे चर्चासत्र आयोजन
अमळनेर प्रतिनिधी :- 11 जानेवारी 2024 रोजी तेरापंथ महिला मंडळ या महिला मंडळाच्यामार्फत मा का दिशाबोध, बेटी की उडान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले कार्यक्रमास मार्गदर्शक ॲड सौ ललिता पाटील या होत्या त्यांनी सर्व महिला सदस्यांना मा का दिशाबोध,बेटी की उडाण या विषयावर मार्गदर्शन करत चर्चासत्र प्रभावीपणे घडवले. चर्चासत्रात क्या कहता है, मां बेटी का रिश्ता? क्या होती है मां बेटी के रिश्तो की बुनियाद? बदलते परिवेश मे कैसे बदल रही है मां बेटी के रिश्ते की भावना? कैसा होना चाहिये उमर के हर पढाव पर माँ बेटी का रिश्ता? समय के साथ विचारो मे परिवर्तन का आभास कैसे करती है मां बेटी? अशा विविध प्रश्नांवर चर्चासत्र झाले कार्यक्रमास आई सोबत मुलीना ही विशेष आमंत्रित करण्यात आले होते
मंचच्या अध्यक्षा स्मिता लोढा व महामंत्री खुशबू जैन व सर्व तेरापंथ महिला मंडळ सदस्या यांनी चर्चासत्रात सहभागी होत चर्चासत्र यशस्वी केले.सर्व उपस्थितांचे अध्यक्ष स्मिता लोढा व महामंत्री खुशबू जैन यांनी आभार मानले.

