1 min read

अमळनेरला महिला पायीवारीचा सांगता सोहळा संपन्न

Loading

अमळनेरला महिला पायीवारीचा सांगता सोहळा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर ते शेगांव महिला पायी वारी 27 डिसेंबर 2023तर 4 जानेवारी 2024 पर्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली होती.. महीला वारीचा नुकताच अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये सांगता सत्कार सोहळा संपन्न झाला…
यावेळी अमळनेर ते शेगाव महिला पायी वारीला ज्यांनी ज्यांनी आर्थीक सहकार्य केले होते त्यांचा सन्मान संत गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा आर बी पवार व महिला वारी प्रमुख सौ ज्योतीताई पवार यांच्या करकमलाने सन्मान करण्यात आला…
चेतन पाटील ग्रामसेवक व प्राचार्य राजश्री नेरकर मुंबई यांच्या मार्फत महाप्रसाद कार्यक्रम ठेवण्यात आला. महाप्रसादाचा लाभ सर्व बंधू-भगिनी येथेच्छ घेतला..
विनाधारी सरला चव्हाण, तुळशीधारी पूजा पाटील ,झेंडेदारी छाया पवार ,कल्पना पाटील ,वंदना पाटील, आशा पाटील, मंगला पाटील, नितल पाटील, रेवा पाटील, शारदा निकम ,उर्मिला जगताप ,शोभा चौधरी, सुरेखा चौधरी, रेखा बाविस्कर, कल्याणी भावे यांचा सत्कार करण्यात आला…
पायी वारीला सहकार्य मोहीत पवार,विलास पाटील, संजय पाटील, भैय्या साळुंखे ,अनिल पाटील, ज्ञानेश्वर कोळी, विकास महाजन, जयेश पाटील ,डॉ जिजाबराव पाटील, श्रीकृष्ण चव्हाण, यांनी केले.
महिला परिवार प्रमुख सौ ज्योतीताई पवार व गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांचा सत्कार उदयोजक अविनाशभाऊ सोनार व सौ. नीताताई सोनार (जी.एम.सोनार नगर चे मालक)
पत्रकार ईश्वर महाजन प्रा.हिरालाल पाटील यांनी शाल बूके देऊन सत्कार केला.
यावेळी सर्व महिला पायीवारीतील भगिनी
व गजानन परीवारातील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *