अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळणारच- मितेश पाठक
![]()
अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळणारच- मितेश पाठक
बॅरिस्टर नाथ पै विद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स बाबत विशेष मार्गदर्शन


मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) अभ्यासाच्या वेळांचं नियोजन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या दिवसभरातील वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुमची शाळा, ट्यूशन क्लासेस, खेळांचे क्लासेस यानंतर तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे ते बघा. साधारणतः तुम्ही झोपतपर्यंत तुमच्याकडे ६ ते ८ तास शिल्लक असतात. यावेळेत अभ्यासाचं नियोजन करा असे प्रतिपादन समुपदेशक मितेश पाठक यांनी केले.
भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या बॅरिष्टर नाथ पै विद्यालयाने आयोजित केलेल्या इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “परीक्षेला सामोरे जातांना” या सत्रात ते बोलत होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल बोरनारे उपस्थित होते.
प्रत्येक विषय/विषयासाठी विशिष्ट वेळ द्या आणि त्यानुसार अभ्यास करा . प्रत्येक विषयाचा थोडा अभ्यास केल्याची खात्री करा. तुमचे कमकुवत विषय/विषय ओळखा आणि त्यांच्यासाठी अधिक वेळ द्या. दैनंदिन अभ्यासाची उद्दिष्टे सेट करणे आणि झोपण्यापूर्वी ते सकारात्मकरित्या साध्य करणे देखील उपयुक्त आहे.
तुमचा वेळ टप्प्यांमध्ये वाटून घेतला की, तुमच्या अभ्यासाच्या वेळा काटेकोरपणे पाळा. अभ्यास करताना फक्त आणि फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा. यावेळी टीव्हीवर काय चालू असेल किंवा कुटुंबातील व्यक्ती कोणाशी काय बोलत आहेत, याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तसंच अभ्यासाच्या वेळी तुमच्या जवळचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद करून ठेवा किंवा खोलीच्या बाहेर नेऊन ठेवा असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत गवस यांनी केले. व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनसाठी भगवान सागर आणि संतोष मेढे यांनी विशेष परिश्रम घेतले.

