अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुषार पाटील यांची निवड
![]()


अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुषार पाटील यांची निवड
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाची निवडणूक नुकतीच पार पडली यात तुषार पाटील यांनी प्रकाश पाटील यांचा पराभव करत विजय प्राप्त केला.यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री प्रवीण आबाजी पाटील मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय माचला हे होते. यावेळी आठ सभासदानी मतदान केले त्यात तुषार पाटील यांना (5)मते मिळवून विजयी झाले.यावेळी श्री आर बी पाटील,श्री सुनील पाटील,मेघश्याम सोनवणे,आसाराम सैंदाणे,एम ए पाटील,प्रमोदिनी पाटील,मनोज पाटील,बापू चव्हाण आदी उपस्थित होते. तुषार पाटील यांच्या निवडीबद्दल आमदार किशोर दराडे,आमदार सत्यजित तांबे,एस डी भिरूड सर,जे के पाटील,संदीप घोरपडे सर,संभाजीराव पाटील,शैलेश राणे,संजय पाटील,आर जे पाटील,सुशिल भदाणे,ईश्वर महाजन,साखरलाल माळी तसेच तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.

