1 min read

द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर येथील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थिनीची
राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी संपन्न…..

Loading

द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर येथील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थिनीची
राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी संपन्न…..
अमळनेर प्रतिनिधी
खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर येथील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थिनी राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी दिनांक 4/1/2024 ते 7/1/2024 रामबाग भोर जिल्हा पुणे येथे एकूण 2 गाईड कॅप्टन व 15 गाईड विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर शिबिरासाठी गाईड कॅप्टन श्रीमती योगेश्री पाटील व श्रीमती नीता बाविस्कर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले सदर शिबिरात इयत्ता आठवीच्या सहभागी विद्यार्थिनी लिनाली ठाकरे, तनिषा बडगुजर, प्रांजल उपासनी ,श्रावणी मोरे ,गार्गी जोशी, कावेरी सोनार ,प्राची महाजन, उन्नती शिंदे ,चैताली शिंदे ,पूर्वा पाटील, रितिका साळुंखे ,भक्ती माळी, मानसी बडगुजर ,नंदिनी पाटील विद्यार्थिनी सहभागी होत्या. जळगाव जिल्ह्यातून एकूण गाईड्स 63 सदर परीक्षेत प्रविष्ट झाल्या होत्या. या विद्यार्थिनींचे पूर्व चाचणी शिबिर देखील पारोळा देवगाव येथे घेण्यात आले होते. सदर विद्यार्थिनींना जळगाव गाईड संघटक श्रीमती हेमा वानखेडे व श्री बेलोंनकर सर तसेच श्री पवार सर यांचे मार्गदर्शन देखील लाभले होते. सदर शिबिरातून विद्यार्थिनी निसर्गाच्या सानिध्यात राहणे, प्रथमोपचार करणे, बिना भांड्यांचा स्वयंपाक करणे, मनोरंजन, धावपळीच्या जीवनातून एक वेगळा अनुभव मिळाला, प्राणिमात्रांवर प्रेम करणे आणि “सदैव तयार राहणे” स्काऊट गाईडचे ध्येय यासारखे विविध अनुभव विद्यार्थ्यांना आले. सदर शिबिरासाठी विद्यार्थिनी दोन महिन्यापासून परिश्रम करत होत्या. यासाठी प्रात्यक्षिक ,लेखी व तोंडी स्वरूपाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनींनी सर्व परीक्षा उत्तम पार पाडल्या आणि सदर शिबिर विद्यार्थिनींच्या भावी वाटचालीसाठी नक्कीच कामी येईल. सदर विद्यार्थिनी राज्यस्तरीय राज्य पुरस्कार परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना राज्यपालांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळते तसेच एक वर्षाच्या कालावधीनंतर त्या यापुढील राष्ट्रीय राष्ट्रपती पुरस्कार साठी प्रविष्ट होऊ शकतात आणि या परीक्षेनंतर त्यांना राष्ट्रपतींच्या सहीचे प्रमाणपत्र मिळेल, तसेच इयत्ता दहावी मध्ये त्यांना दहा गुण देखील या परीक्षेचे मिळतील. सदर विद्यार्थिनींसाठी कोणत्याही केंद्र सरकार पुरस्कृत परीक्षांमध्ये राखीव जागा देखील असतात .या सर्व परीक्षांचा विद्यार्थिनींना भावी वाटचालीसाठी नक्कीच उपयोग होईल. या सर्व योजनेसाठी शाळेचे चेअरमन माननीय प्रदीप भाऊ अग्रवाल ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा सूर्यवंशी मॅडम ,पर्यवेक्षक श्री विनोद कदम सर व ज्येष्ठ शिक्षक श्री माळी सर या सर्वांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन व परवानगी दिली त्यांचे मनापासून आभार .सदर शिबिरासाठी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे देखील सहकार्य लाभले. या विद्यार्थिनींना प्रवासासाठी अमळनेर बस आगारातील श्री वाडेकर सर यांचे देखील सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्यामुळे विद्यार्थिनींचा प्रवास सुखरूप झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *