1 min read

जिल्हा परिषद शाळा जळगाव खुर्द येथे परदेशी विदयार्थ्यांची भेट

Loading

जिल्हा परिषद शाळा जळगाव खुर्द येथे परदेशी विदयार्थ्यांची भेट
जळगाव – येथील जिल्हा परिषद शाळा जळगाव खु येथे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या संकल्पनेतून व सॅनरोझ फाउंडेशन यु एस ए यांच्या सौजन्याने अमेरिका, फ्रांसच्या विदयार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत अध्यापन केले. टीम यु एस ए व्हॉलीन्टीयर प्रोग्राम अंतर्गत सॅनरोझ फाउंडेशनच्या रोजमीन खिमानी (अमेरिका), सानिया प्रधान (अमेरिका)
ओरेन सेल्स (फ्रांस )अलिसा बुक मेयर (अमेरिका)यांनी शाळेला भेट दिली. शाळेच्या बाला उपक्रम, सी एस आर अंतर्गत बांधलेले किचन शेड, स्वच्छतागृह, डिजिटल वर्ग या बाबींचे कौतुक केले. विदयार्थ्यांसोबत संवाद साधत अध्यापन केले.यु एस ए टीम ने शाळेला महावाचन अभियान उपक्रम विविध पुस्तके, शैक्षणिक साहित्य भेट दिले.स्वागत मुख्याध्यापक रेवानंद पिंपरकर यांनी केले. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले.सूत्रसंचलन केंद्र प्रमुख अविनाश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन दिनेश चौधरी यांनी केले. जि प शाळेतील विदयार्थ्यांनी परदेशी शिक्षकांकडून आनंदाने इंग्रजी विषयाचे संभाषण कौशल्याचे धडे गिरवले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रइसा तडवी, दिनेश चौधरी, अविनाश पाटील, रेवानंद पिंपरकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *