1 min read

लोकमान्य विद्यालयातील भूषण महाले व रेखा कांबळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Loading

लोकमान्य विद्यालयातील भूषण महाले व रेखा कांबळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी:
६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून चंद्राई बिग बिलियन फाउंडेशन मल्टीपर्पज फाउंडेशन आणि रायबा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रुक्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय धुळे आणि एसएनडिटी विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक भूषण सुरेश महाले यांना क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने तर शिक्षिका सौ. रेखा भगवान कांबळे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्राई बिग बिलियन मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे आणि सचिव ममता सोनवणे तसेच रायबा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्राध्यापक प्रमोद पाटील, खजिनदार प्रिया पाटील, एसएनडीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे.शेख तसेच प्रा.सचिन पवार सर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *