1 min read

प्रत्येक महान व्यक्तीच्या जिवनात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे—सौ.ज्योत्स्नाताई जाधव

Loading

प्रत्येक महान व्यक्तीच्या जिवनात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे—सौ.ज्योत्स्नाताई जाधव

क्रांतिज्योती सावित्रीमाई जयंती दिनी स्त्री भ्रूण हत्या विषयी ओवीतून संदेश!

जगातील प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात महिला शक्तीचा मोठा वाटा असून क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांच्या महान कार्यातून स्त्रीयांनी प्रेरणा घेतली आहे.असे प्रतिपादन सावित्रीमाई फुले महिला मंडळ अमळनेर च्या सचिव सौ.ज्योत्स्ना ताई प्रमोद जाधव यांनी आपल्या भाषणात केले ते दत्त नगर भुसावळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. स्त्रीभ्रूण हत्या विषयी जोतिबा फुले यांनी सावित्रीमाई यांना कसे सांगितले तो प्रसंग त्यांनी उपस्थित महिलांना सांगितला की पोटातच किती सावित्री च्या लेकींची हत्या झाल्या आणि गरोदर मातांना किती त्रास होत असे ज्योत्स्ना ताईंनी आपल्या कवितांच्या ओवीच्या माध्येमातून गायनातून त्या काळातील जोतिबांचा अनुभव सांगून उपस्थितांची मने जिंकली! स्त्री भ्रूण हत्या रोखा मुलगी वाचवा हा संदेश हि त्यांनी आपल्या भाषनातून जनतेला दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *