चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न….
![]()


चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न….
अमळनेरप्रतिनिधी- (भुषण महाजन)
ज्यांनी भारताला क्रांतीकारी विचार देऊन भगिनींना ज्ञानामृत पाजले अशा ज्ञानयोगिनी, ज्ञानगंगोत्री सावित्रीआई पासून आजच्या स्रियांनी प्रेरणा घेऊन सर्वच क्षेत्रात पुढाकार घेतला पाहिजे आणि समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे."* असे प्रतिपादन मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त सोसायटी हॉल शास्त्रीनगर, वाशी नाका चेंबूर येथे खान्देश मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी, प्रा. सुनिल भाऊलाल महाजन, सावित्रीबाई फुले महिला मंडळ मुंबईच्या अध्यक्षा सौ. रेखा मुरलीधर महाजन तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पंडीत लोखंडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. छबुलाल गणपत माळी यांनी सावित्रीआई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तसेच सागर जामनिक, दुर्गाताई ढगे, छायाताई साळुंखे, पूजाताई कोकरे, मायाताई साखरे व पोपट महाजन यांनी सावित्रीआईंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या प्रसंगी माळी समाजातील बंधू-भगिनींसोबत इतर समाजातील बंधू-भगिनींनी देखील सावित्रीआई फुले यांना आदरांजली वाहिली. यावेळी डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी, प्रा.सुनिल भाऊलाल महाजन, सौ. रेखा मुरलीधर महाजन व सागर जामनिक यांनी सवित्रीआईंच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. यावेळी सौ. रत्ना जगन्नाथ माळी व सौ. शुभांगी शशिकांत महाजन यांनी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कु. मानसी जितेंद्र माळी, कु.मनस्वी जितेंद्र माळी व कु. काजल राजेश चव्हाण या छोट्या मुलींनी इंग्रजीमधून व्यक्त केलेले सवित्रीआईं विषयी विचार कौतुकास्पद ठरले. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शशिकांत मोतीलाल महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश पंडीत लोखंडे, जगन्नाथ दयाराम माळी, शशिकांत मोतीलाल महाजन, प्रकाश आनंदा महाजन, ज्ञानेश्वर छबुलाल माळी, जितेंद्र छबुलाल माळी, रविंद्र छबुलाल माळी, समाधान गोकुळ महाजन, विक्रम भगवान महाजन व भूषण नामदेव महाजन यांच्यासह सर्व युवक, युवती व भगिनींनी विशेष मेहनत घेतली.

