1 min read

महाराष्ट्रातील पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर

Loading

महाराष्ट्रातील पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्रात ज्यांच्या नावाने पत्रकार दिन साजरा केला जातो ते म्हणजे बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर होय या संपादकाचा जन्म कोकणातील देवगड तालुक्यातील टेंभुर्ले ह्या गावात 1812 मध्ये झाला त्यांनी आपल्या वडिलांकडून मराठी व संस्कृत याचे अध्यापन केले इंग्रजांच्या काळात समाज जागृतीसाठी व सरकारला जनतेच्या भावना समजण्यासाठी दर्पण नावाचे पाक्षिक सुरू केले हे पाक्षिक त्या काळात दोन भाषेत सादर होत असे त्यात निम्मे पाने मराठीत तर निम्मे पाने त्याच मजकुराचे छापले जात असे..मराठी लेख बातम्या मराठी वाचकांसाठी असायच्या तर इंग्रजी बातम्या व लेख हे राजसत्तेच्या लक्षात समाजाच्या समस्या याव्यात यासाठी होत्या. नंतर हे दैनिक वृत्तपत्र रूपात सादर झाले. हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले. ह्या काळात त्याची चांगली ख्याती होती. बाळशास्त्री जांभेकर यांनी प्राध्यापक नोकरी करुन हे वृत्तपत्र चालविले. ते कुलाबा वेध शाळेचे संचालक ही होते. अनेक भाषांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांना फ्रेंच भाषेच्या अभ्यासात प्रगती केल्याबद्दल फ्रेंच अधिकाऱ्याकडून सत्कार करण्यात आला होता सुरुवातीला बीबीसी लंडन येथून दिल्या जाणाऱ्या बातम्यांचे स्पष्टीकरण होत नव्हते त्यामुळे दर्पण वृत्तपत्रात अनुवादक म्हणून दर्पण वृत्तपत्राने ती माहिती मराठीत लोकांना पुरविली दर्पण वृत्तपत्र अगोदर बंगालमधील बंगाली गॅझेट नावाचे वृत्तपत्र निघाले होते त्या काळात समाज जागृती समाज सुधारक मार्फत केली जात असे परंतु वृत्तपत्र चालू झाल्याने महाराष्ट्रात जनजागृतीची लाट निर्माण झाली. पुढे मराठा व केसरी या वृत्तपत्रांनी इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली त्यामध्ये समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुद्धा चालू होते. वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आहे पत्रकाराने निस्वार्थ भावनेने ,निर्भीड सडेतोड पत्रकारिता केली पाहिजे .कोणत्याही पक्षाच्या दावणीला आपली पत्रकारिता बांधता कामा नये. आज पत्रकारिता राजकारण्यांच्या इशाऱ्यावर चालते सरकारला जे अपेक्षित आहे तेच पत्रकार छापतात परंतु खरी पत्रकारिता समाजाला देशाला नवी दिशा देते. पत्रकाराने सत्य तेच छापावे पत्रकाराची छबी कायम चांगली ठेवावी. पत्रकार त्याला व्यवसायाचे स्वरूप आणू नये बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची ज्योत पेटवून पत्रकार हा समाज घडवण्याच्या मार्गातील दीपस्तंभ आहे हे दाखवून दिले.महाराष्ट्र मध्ये स्वातंत्र्यप्राप्ती नंतर अनेक वृत्तपत्र उदयास आले. अनेक वृत्तपत्रांनी सरकारला वेळोवेळी समस्या बाबत प्रश्न विचारले. आज पत्रकारीता त्या पध्दतीने जातांना दिसत नाही. महागाई, बेरोजगार, अंधश्रद्धा वाढीस लागल्या आहेत. दांभिक बाबांचे अशास्त्रीय विधाने होतांना पत्रकारीता शांत आहे. सर्रास शासकिय दालनात पैशाशिवाय काम होत नाही. यासाठी पत्रकारितेची लेखणी रुपी तलवार चालली पाहिजे. चमकोगीरी पेक्षा वास्तवतेला महत्व दिले गेले पाहिजे. डाॅ बाबासाहेब यांनी केलेली निर्भीड पत्रकारितेचा एक अप्रतिम आदर्श आहे. त्यांनी वृत्तपत्र मुकनायक, प्रबुद्ध भारत याद्वारे समाज जागरुक केला. गावागावात त्यांचे पत्र पोहचले. शंकरराव खरात सारखे प्रचारक काही वाहतुकीच्या सोई नसतांना गावागावात संदेश पोहचले.आचार्य अत्रे सारखी खंबीर पत्रकारितेची आज गरज आहे. आज महसुल वसूल होण्यासाठी दारुचे दुकाने उघडी ठेवणार याच्या बातम्या वाचून खेद वाटतो. देशाच्या महसुलासाठी व्यसनाचे बळी वाढवायचे हे तत्वात बसत नाही यावर आवाज उठत नाही. गुटका व नशाबंदी बाबत जनजागरण करण्यास सरकार सुचविते परंतु गुटका, तंबाकु यांचे पत्रकार कारखान्यांना सरकार परवानगी देते याबाबत पत्रकाराने जाब विचारला पाहिजे. भारत देशात निर्भीड पत्रकाराला अडचणी आणल्या जातात. खर मांडणे हे विरोधकांना नामोहरण करण्यासारखे आहे. सत्याला प्राधान्य देणारी पत्रकारिता कुणापुढे नतमस्तक होत नाही. सत्य मांडण्याचे धाडस वाढल्यास पत्रकारितेला वेगळी दिशा येइल. पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना व सर्व पत्रकारांना अभिवादन!!

मा.सोपान भवरे अमळनेर

(लेखक हे मराठी लाईव्ह न्युजचे विशेष प्रतिनिधी आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *