प्रशांत भामरे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड
![]()

प्रशांत भामरे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त 126 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुणवंत शिक्षक गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची कार्यकारणी घोषित करण्यात आली.प्रशांत भामरे सर यांच्या सेवाभावी कामाची दखल…महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची कार्यकारणी घोषित करण्यात आली.प्रशांत भामरे सर यांची यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या
कोकण विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी ठाणे, पालघर ,रत्नागिरी, सिधुदुर्ग, रायगड मधून
3 ते 4 हजार शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. या प्रित्यर्थ प्रशांत भामरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या ते सिद्धार्थ विद्यालय गाळेगाव येथे सहशिक्षक म्हणून काम करत आहेत. विविधांगी पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. आज पर्यंत त्यांनी शिक्षकांच्या सेवेसाठी अनेक प्रकारची पदे भूषवली आहे. शिवसेना विधानसभा कल्याण पश्चिमचे ते समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रतिष्ठित
असलेल्या ठाणे पालघर विद्यासेवक पतपेढीचे संचालक आहेत.शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा ते सांभाळत आहेत.
प्रशांतजी भामरे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या
कोकण विभाग अध्यक्षपदी निवड म्हणजे खानदेश वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी ठाणे पालघर रत्नागिरी सिधुदुर्ग रायगड
3 ते 4 हजार शिक्षक /मुख्याध्यापक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कनिष्ठ महाविद्यालय मुंबई विभाग. सचिव कॉलेज सोसायटी घाटकोपर मुंबई,विशाल बावा यांनीही प्रशांत भामरे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ता वाहतूक सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संघटन,नागपूर अंतर्गत शिक्षक युनिट तर्फे भामरे सरांचा स्तुत्य निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

