माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या प्रयत्नांना यश,स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेजसाठी शिक्षणाधिकारी काढणार पत्र
![]()
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती जळगाव जिल्हा याच्या प्रयत्नांना यश
स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेजसाठी शिक्षणाधिकारी काढणार पत्र
माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना दिले होते निवेदन शिक्षणाधिकारी माध्य.काढणार जळगाव पत्र.

जळगांव प्रतिनिधी
शासन निर्णय दिनांक 19/12/2023 या शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांचे वेतन त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती जळगाव जिल्हा दि. 26/12/2023 ला जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते.
श्रीमती डॉक्टर किरण कुवर माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली , श्री शर्मा साहेब वेतन पथक अधीक्षक व प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटनांची समन्वय समितीची बैठक विद्यानिकेतन जळगाव येथे दि.4 जानेवारीला झालेल्या मिटीग मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ,बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय, ॲक्सिस बँक व एचडीएफसी बँक च्या प्रतिनिधींनी शारीरिक पॅकेजच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा मीटिंगमध्ये मांडल्यात समन्वय समितीने कोणत्या बँकेमध्ये खाते काढावे याचा संपूर्ण निर्णय कर्मचाऱ्यांवर सोडवलेल होत पंरतु 4 जानेवारी च्या शासन निर्णयानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत होनार असल्याचे माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती जळगाव जिल्हा यांनी केले आहे.नारायण आनंद वाघ जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव,समन्वयक तुळशीराम सोनवणे माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा,प्रभाकर बोरसे जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी जळगाव,गोविंदा पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना जळगाव,गिरीश नेमाडे जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद,सुरेश अहिरे कार्याध्यक्ष शिक्षक परिषद जळगाव,किशोर घुले प्रहार संघटना जळगाव,प्रशांत कोल्हे जिल्हा कार्याध्यक्ष क्रीडा शिक्षक संघटना जळगाव,सिद्धोधन सोनवणे जिल्हाध्यक्ष बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद,प्रशांत नरवाडे जिल्हाध्यक्ष इस्तू संघटना,आर डी बोरसे विनोद महेश्री खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना,सुनील वानखेडे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ,कृष्णराव विसावे जिल्हाध्यक्ष शिक्षक शिक्षकेतर सेना जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठया सं खेने उपस्थित होता.

