1 min read

उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित…….

Loading

सोपान भवरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित…….

अमळनेर प्रतिनिधी- शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील उपक्रमशील शिक्षक ,साहित्यिक, विविध विषयांवर सडेतोडपणे लिखाण करणारे सोपान भवरे यांना नुकताच सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…
मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ आणि क्रांतीसुर्य प्रतिष्ठान दिपनगर या सामाजिक संस्थेच्या वतीने लेखक, साहित्यिक, मराठी लाईव्ह न्युजचे विशेष प्रतिनिधी तथा उपक्रमशील शिक्षक श्री.सोपान भवरे सर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सेवा पुरस्काराने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मानव सेवा ईश्वर सेवा संघ आणि क्रांतीसुर्य प्रतिष्ठान आयोजित सामाजिक क्षेत्रात कर्तृत्ववान व प्रतिभावान व्यक्तींचा सत्कार आयोजक अभियंता मोहन सरदार ,मिलिंद खंजीरे, संदीप वाघ .
.कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपनगरचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्राध्यापक डॉक्टर जतीन मेढे होते. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर विजया बोरकर,रवींद्र सोनकुसरे, योगेश इंगळे ,नसंजय हिवरे, रवींद्र डांगे ,डॉक्टर कल्पना बावा उपस्थित होते.
त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे अभिनंदन मराठी लाईव्ह न्युज चे संपादक ईश्वर महाजन, समता युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट, लेखन मंचचे संपादक अजय भामरे, प्रोटान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद निकम, हिंदी अध्यापक मंडळाचे मुनाफ तडवी, राठोड सर, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाळे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, ओबीसी शिक्षक संघटनेचे डि.ए.सोनवणे व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *