मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा- अनिल बोरनारे
![]()
मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा- अनिल बोरनारे
अनिल बोरनारे यांच्या भांडुपमधील शाळांना भेटी

मुंबई (प्रतिनिधी) मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे राजकारण करून शिक्षकांना नाहक मानसिक त्रास देणाऱ्यांना शिक्षक मतदार संघ्याच्या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी केले.
आज अनिल बोरनारे यांनी त्यांच्या कार्य अहवालाचे व कार्यावर आधारित दिनदर्शिकांचे वाटप करण्यासाठी भांडुप परिसरातील विविध शाळांना भेटी दिल्या त्यावेळी शिक्षकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
मागील १८ वर्षांपासून मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक जवळ आली की बँक बदलायची व आपली राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग कोण करतेय ? हे मुंबईतील शिक्षकांना आता कळले असून यावेळी शिक्षकच त्यांना धडा शिकविणार असून शिक्षक असलेला उमेदवार निवडून देणार असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.
नविन वर्ष सुरू होऊन चार दिवस उलटून गेल्यावरसुद्धा शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने गृह कर्ज, विमा तसेच इतर कपातीचे हप्ते थकणार असून शिक्षकांना संबंधित बँका व विमा कंपन्यांचा दंड भरावा लागणार आहे.
बँकेबाबत आक्षेप…
मुंबईतील शिक्षकांचे वेतन युनियन बँकेत असतांना मुंबई बँकेत पुल खाते करतांना सगळ्या संघटनांना विश्वासात का घेतले नाही ?
राष्ट्रीयकृत बँकेत असणाऱ्या सुविधा मुंबई बँकेत आहेत का ?
कोणाला राजकीय फायदा होणार आहे ? असे सवालही अनिल बोरनारे यांनी विचारले आहेत.

