1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा ——-!!!

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा ——-!!!
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस अर्थात बालिका दिवस निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल श्री डुबकी हनुमान मंदिर अमळनेर या ठिकाणी नेण्यात आली होती .सदर प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत भावेश चंद्रकांत लोहार व सावित्रीच्या भूमिकेत राशी या मुलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची सखोल पणे माहिती उपक्रमशील शिक्षक श्री डी. ए. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना देऊन शिक्षण हे आपल्या भविष्याचा वेध घेणारे वाघासारखे रक्षण करणारे आणि नवी दिशा देणारे असे अमृतकुंभच समजावा.’ विद्या दाता भारत माता, पूजतो आम्ही नमुनी सावित्री माता, सावित्री माता!
सदर प्रसंगी निसर्गाच्या सानिध्यातील विविध प्राणी, पक्षी, झाडे, वेली यांची माहिती देऊन डुबकी मारुती मंदिर हे नाव कसे रूढ झाले याविषयी महंत नागाबाबा रामगिरी( प्रयागराज) या ठिकाणाहून स्थायिक झालेले 1998 पासून त्यांनी या ठिकाणी सेवेला सुरुवात केलेली आहे .दरवर्षी भंडारा सुरुवात होण्याचे कारण म्हणजे 2 फेब्रुवारी 2000 ते 8 ऑगस्ट 2000 अशी सलग सहा महिने अखंड रामधून सुरू ठेवण्यात आलेली होती .त्यानंतर दरवर्षी हनुमान जयंती निमित्ताने महाप्रसादाचा भंडारा म्हणून सर्व अमळनेर शहरवासीयांना लाभ देण्यात येतो. या ठिकाणी पूर्वीच्या काळी डुबकी नावाचे गाव होते. आणि महापुरात त्या गावाचे सर्व कुटुंब वाहून गेले त्यावरून फक्त मारुती मंदिर शिल्लक राहिल्याने त्या मंदिरास श्री डुबकी हनुमान मंदिर असे नाव देण्यात आले. त्या काळात अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हे गाव होते. पलीकडे रेल्वेच्या मार्ग ब्रिटिश काळात तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी श्री डुबकी हनुमान मंदिर असे नाव देण्यात आलेला बोर्ड पहावयास मिळतो. 1965 मध्ये अशा प्रकारे सदर मंदिराचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आजची सुंदर अशी परिस्थिती बघावयास मिळते. अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. शैक्षणिक सहल प्रमुख श्री ए .पी. जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच मुख्याध्यापक संदीप पवार यांच्याकडून सर्व शालेय विद्यार्थ्यांना जिलेबी हा गोड पदार्थ वाटण्यात आला. पी.एम. ठाकरे ,डी. एस. कारले, एम. एस. सुशीर,आर.डी. महाजन, व्ही.डी. पाटील, वा.जे. पाटील , पी.ए.शेलकर, तसेच व्ही.डी. जाधव, बी. एस. चव्हाण , ए . यू. महाजन, सी.डी. निकम यांनी शालेय विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी सहकार्य केले. तर सदर चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे हेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *