1 min read

प्रतापचे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन

Loading

प्रतापचे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन

खानदेश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय व फार्मसी कॉलेज चे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १२,१३ व १४ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेले स्नेहसंमेलन यावर्षी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.स्नेह संमेलनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे हा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी महाविद्यालयांत विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.यामध्ये रंगमंच व साऊंड सिस्टीम, विविध मनोरंजन, नाट्य एकांकिका, शेला पागोटे, शिस्त, फॅन्सी ड्रेस व विविध स्पर्धा, निबंध वक्तृत्व कथाकथन, बैठक व्यवस्था, रांगोळी केशरचना मेहंदी स्पर्धा, आनंद मेळावा व रेकॉर्ड भेट, क्रिडा, पाककला स्वीट डिश सलाद स्पर्धा,काव्य वाचन,पारीतोषक व प्रमाणपत्र वितरण ,फाईन आर्टस गॅलरी आणि प्रसिद्धी समिती इत्यादी समित्यांचा समावेश आहे.
स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी समिती प्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामाला उत्साहात सुरुवात केली असून महाविद्यालयांत चैतन्य निर्माण झाले आहे. या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थीं ग्रुपवर येणाऱ्या व नोटीस बोर्डावरील सुचना बघाव्यात तसेच मोठ्या संख्येने विविध स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन सर , स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.पराग पाटील व प्रा.दिनेश भलकार सर, सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच खानदेश शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *