पथनाट्य आणि घोषवाक्यांमधून उलगडणार
महिला सबलीकरणाचा विषय
![]()


पथनाट्य आणि घोषवाक्यांमधून उलगडणार
महिला सबलीकरणाचा विषय
ठाणे प्रतिनिधी
तेजस्विनी महिला संमेलनांतर्गत राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाणे (पू.) आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घोषवाक्य आणि पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महिला सबलीकरण’ हा दोन्ही स्पर्धांचा विषय आहे. या विषयाला अनुसरून महिलांच्या सामाजिक, आरोग्य, शिक्षण, कायदा आणि सुरक्षेच्या स्थिती संबंधात पथनाट्याचे सादरीकरण आणि घोषवाक्ये तयार करायची आहेत.
या दोन्ही स्पर्धा 18 वर्षांवरील महिलांसाठी असून घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त तीन घोषवाक्ये पाठवता येणार आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत किंवा इंग्रजी या चारही भाषांमध्ये घोषवाक्ये स्वीकारली जातील.
दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी दादा कोंडके अॅम्फी थिएटर ,ठाणे येथे पथनाट्य स्पर्धांचे सादरीकरण आणि दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे
दि. 28 जानेवारी 2024 रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार्या भव्य महिला संमेलनात निवडक घोषवाक्ये फलकांवर लावण्यात येणार आहेत आणि याच संमेलनात प्रथम क्रमांक पटकावणार्या पथनाट्य कलाकारांना सादरीकरणाची संधी देखील दिली जाणार आहे.
घोषवाक्य स्पर्धेसाठी पुढील https://bit.ly/JoinVyasCreations गुगल लिंकच्या माध्यमांतून स्पर्धकांनी नोंदणी करावी, याच गुगल फॉर्ममध्ये घोषवाक्ये देखील पाठवता येणार आहेत. ज्यांना गुगल फॉर्म भरणे शक्य नाही त्यांनी 7400188171/99637255 या क्रमांकावर नाव, पत्ता आणि घोषवाक्ये व्हॉट्सऍप करायची आहेत.
विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे, सन्मानपत्र आणि एक पुस्तक भेट दिले जाणार आहे.
शुक्रवार, 5 जानेवारी 2024 ही दोन्ही स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्याची अंतिम तारीख असून जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन नाविण्यपूर्ण घोषवाक्ये पाठवावी असे आवाहन राज्ञी वुमन वेलफेअरच्या कार्यकारी संचालक वैशाली गायकवाड यांनी केले आहे.
पथनाट्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी प्रतिभा नातू – 8879073186 आणि अपर्णा 9967637255 यांना संपर्क करावा.

