1 min read

नगरपरिषदेच्या वाढीव घरपट्टी व पानपट्टीच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन

Loading

नगरपरिषदेच्या वाढीव घरपट्टी व पानपट्टीच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन

शिरीष दादा मित्र परिवाराच्या आंदोलनाने नगरपरिषदेचा निर्णय मागे…

कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही..!

दुघलकी निर्णय तात्काळ मागे घेतलाच पाहिजे..!!

अश्या घोषणांनी परिसर दाणानून सोडला होता मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यावर आंदोलन मागे…

अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर शहरातील नागरिकांना नगरपरिषदे मार्फंत नळपट्टी वसली करीता देणायां नळपट्टी बील मधील रकमेस द.म. द. शे.व्याज(२%) प्रमाणे लावण्याचा तुगलगी निर्णय घेत बील नागरिकांना दिले जात आहे. कायद्याचा धाक दाखवत सदर व्याज वसूलीचे धोरण म्हणजे अमळनेर करांची आपण एक प्रकारे लूट करीत आहात अशी भावना जनमानसाची झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांचा मालमत्ता धारकांना लोकवर्गणीच्या नावाखाली वारंवार वसुलीचा घाट घातला जात आहे. (बांधकाम परवानगीच्या वेळेस लोकवर्गणी, नळ कनेक्शन घेतांना लोकवर्गणी, मालमत्ता वार्पीक कर मध्ये लोकवर्गणी ) म्हणजे एकच व्यक्तीकडून किती वेळेस लोकवर्गणी घ्यावी याला देखील मर्यादा आहेत की नाही? त्याचप्रमाणे खुल्या भुख्ंडाना देखील कर नगरपरिषदेने निश्चीत केला आहे. आपण आम्हा नागरिकांना सुख सोयी देण्यापेक्षा अव्वाचा सब्वा छुप्या करांचा माध्यमातुन एक प्रकार लूटच करीत आहात वरील तूगलगी निर्णय /सावकारी वसुली निर्णय तात्काळ नागरीहितास्तव मागे घ्यावा या करीता आज आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे लेखी जो पर्यत देत नाही तो पर्यंत मुख्याधिकारी यांचा दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन ते अडीच तास आंदोलन केल्याने अखेर मुख्याधिकारी सरोदे साहेब यांनी लेखी आश्वासन देत मार्च 2024 पर्यंत मुदत वाढ देत. शासना कडे मार्गदर्शन मागवण्या बाबत लेखी आश्वासन दिले. आंदोलन गटनेते बबलीभाऊ पाठक, भाऊसाहेब महाजन, बाळासाहेब संदानशिव, पंकज चौधरी, दिपक चौघुले, अविनाश जाधव, नरेश कांबळे, मनोज शिंगाणे, संतोष पाटील,राहुल कंजर, अतुल चौधरी आदी सह कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाला बसले होते. शिरीष दादा मित्र परिवार आघाडीचा विजय असो..! कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही..! दुघलकी निर्णय तात्काळ मागे घेतलाच पाहिजे..!! अश्या घोषणांनी परिसर दाणानून सोडला होता मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यावर आंदोलन थांबविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *