1 min read

शेठ के.बी.विरा गुजराथी शाळेत विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर योगासने देखील करावेतडॉ. मनिलाल शिंपी

Loading

शेठ के.बी.विरा गुजराथी शाळेत विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर योगासने देखील करावेत: डॉ. मनिलाल शिंपी

ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी) डोंबिवली पूर्व मधील शेठ श्री. के. बी. वीरा हायस्कूल गुजराती माध्यम शाळा येथे विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक 27-12-2023 विद्यार्थ्यांचे शेती ,विद्युत,पाणी, पर्यावरणावर आधारित विज्ञान प्रदर्शन,भाषांचे भिंतीपत्रके व वाहतूक नियमांचे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी,यांचा हस्ते करण्यात आले.यावेळी रामनगर वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार संजय बडगुजर यांनीही विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा दल आणि वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेट्टी यांनी वाहतूक नियंत्रण,आणि अपघाताचे प्रमाण कमी कसे करता येईल यावर चित्र प्रदर्शन आयोजित करून विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष वेधले. रोटरी क्लब मिड टाऊन डोंबिवलीचे सक्रिय समाजसेवक डॉ.किशोर अढळकर यांनी सर्व मुलांना नागरी संरक्षण आणि आरोग्य विविध विषयांवर माहिती दिली.यावेळी आर एस पी अधिकारी करणसिंह जडेजा तसेच संस्थेचे पदाधिकारी मा.श्री.रमणिकभाई देढीया शाळेचे मुख्याध्यापक प्रज्ञेश नायक इतर सहकारी शिक्षक शिक्षकेतर व पालक विद्यार्थी या सर्वाचा उपस्थितीत पार पडले. या या प्रदर्शनाला विविध शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनी व पालकांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर योगासने, प्राणायाम नियमित करावेत,आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रबोधन करावे.असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *