1 min read

विदयाविहार काँलनीत दत्त जयंती उत्साहात संपन्न..दत्त उत्सव साजरा करत होम पूजन व अनेक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Loading

विदयाविहार काँलनीत दत्त जयंती उत्साहात संपन्न..दत्त उत्सव साजरा करत होम पूजन व अनेक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने तिन्ही देव, भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू प्रसन्न होतात आणि तिन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणाऱ्या दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो.
याच पाश्वभुमीवर अमळनेरला विदयाविहार काँलनीत दत्त मंदिरात मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथील विद्याविहार कॉलनी दत्त मंदिरात गेल्या 30 ते 35 वर्षापासून दत्त उत्सव उत्साह पूर्ण वातावरणात साजरा केला जातो…
दत्तसेवक डॉ बी टी पाटील यांच्या आशीर्वादाने व आई कै मिराबाई बाबुराव पाटील यांनी सुरू केलेली परपंरा
मुलगा जयवंतराव पाटील व त्यांचा परीवाराने सुरु ठेवली आहे.नित्यनेमाने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते..
यावर्षी ही दत्त जयंती कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षीही जन्मोत्सव, रात्री भजन, होम वहन व महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी 1000 पेक्षा अधिक लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नितिन भावे महारांजानी पारायणाचे वाचन केले.
स्वप्नील पाटील नूतन पाटील यांनी पूजा केली.
यावेळी विदयाविहार काँलनीतील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदयाविहार काँलनीतील मित्र परीवार यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *