1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात २९ व ३०डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “युवा स्पंदन २०२३”चे आयोजन.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात २९ व ३०डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “युवा स्पंदन २०२३”चे आयोजन.

जळगाव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी दि.२९ व ३०डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “युवा स्पंदन २०२३” चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्नेहसंमेलनाचे शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी ९ वाजता डॉ.किरण कुवर मॅडम (शिक्षणाधिकारी-माध्य.जि. प.जळगाव) ह्या उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून मा.दिपाली पाटील (शिक्षण उपनिरीक्षक-उच्च माध्य.जि.प.जळगाव) मा. श्री.डी.टी.पाटील (कोषाध्यक्ष केसीई सोसायटी) मा.श्री. शशिकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी तथा सांस्कृतिक समन्वयक केसीई सोसायटी) प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे तसेच उपप्राचार्या श्रीमती करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.श्री. आर.बी.ठाकरे,समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे,प्रा.उमेश पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.महेंद्र राठोड, उपप्रमुख प्रा.शोभना कावळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी रांगोळी, मेहंदी व विविध छंद प्रदर्शन, काव्यवाचन व उत्स्फूर्त भाषण, फूड फेस्टिवल, मनवा लागे…….”एक सुरेली मैफिल” व गरबा नृत्य आदी कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात गीत गायन व वादन, भारतीय प्रादेशिक पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि दुपारच्या सत्रात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विजेत्या स्पर्धांना मा.श्री. रवींद्र घोंगे (कनिष्ठ लेखा परीक्षक लेखाधिकारी कार्यालय (माध्य.) जि.प. जळगाव), ऍड.पी.एन.पाटील (सचिव केसीई सोसायटी जळगाव) यांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. तरी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी वरील दोन्ही दिवस सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होऊन उपस्थिती नोंदवावी, तसेच संपूर्ण स्नेहसंमेलनादरम्यान कडक शिस्तीचे पालन करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा सांस्कृतिक समन्वयक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या, पर्यवेक्षक,समन्वयक व स्नेहसंमेलन प्रमुख, उपप्रमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *