शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देणारे शेतकरी नेते प्रा.सुभाष पाटील यांचा व सहकारी शेतकरी बांधवाचा झाला सत्कार
![]()





शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देणा-या प्रा.सुभाष पाटील यांचा व सहकारी शेतकरी बांधवाचा झाला सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर भुमीला माता समजणाऱ्या भूमिपुत्रांचा सत्कार शेतकऱ्यांचे कैवारी
असणाऱ्यांचा नुकताच ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी केला.
अमळनेर तालुक्यात ठीक ठिकाणी पिक विमा कंपनीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देत शेतकऱ्यांचे चांगभले केले म्हणून लोक स्वतःहून बोलावतायत व सत्कार करत आहेत…. प्राध्यापक सुभाष पाटील हे शेतकरी बांधवांसाठी नेहमीच आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नियमित कटिबद्ध असतात त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत…
आज शिरसाळे, अंचलवाडी,पळासदडे, एकरुखी, लोंढवे वासियांकडून शेतकऱ्यांचे कैवारी शेतकरी नेते प्राध्यापक सुभाष जिभाऊ, कृषीभूषण सुरेश पाटील डॉ.अनिल शिंदे,धनगर दला पाटील, गिरीश प्रकाश पाटील, नितीन बापूराव पाटील, मयुर प्रविण पाटील आदींचा अमळनेर तालुक्यात ठीक ठिकाणी सत्कार हे होत आहे.
लाखो रुपयाचा अमळनेर तालुक्यातील पिक विमा मंजूर झाला व त्यांनी अथक परिश्रम केल्यामुळे त्यांचा सत्कार अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी केला व त्यांच्या कामाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…

