1 min read

संवेदनशीलतेचे हृदय असलेला कर्मयोगी साने गुरुजी!!

Loading

संवेदनशीलतेचे हृदय असलेला कर्मयोगी साने गुरुजी!!

भारतात मानवतेच्या अचल भींती उभारणारे खूप विचारवंत झालेत. आपल्या सुंदर गुणांनी ह्या भूमीत सुगंध पसरविला. अनेक दीन, दुबळयांचे दु:ख आपले मानून त्यांनी एक वेळ उपाशी राहून पददलितांना,वंचितांना घास भरविला. आपल्या अनमोल औदार्य शक्तीने पाठीवरून हात फिरवला त्यात साने गुरुजी चे नाव अग्रभागी आहे. अशा ह्या साने गुरुजींची जन्मभूमी होती पालगड नावाचे नारळाच्या, फोफळीच्या बहरलेले गाव.ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील ह्या खेडयात

आई यशोदा व पिता सदाशिव साने यांच्या पोटी जन्मलेले कष्टाळू बाळ म्हणजे शाम होय. शामचे नावच कागदोपत्री पांडुरंग सदाशिव साने हे आहे .आईवडिलांचे हे 3 रे अपत्य होते.त्यांचा जन्म24 डिसेंबर 1899सालाचा होता.साने गुरुजींचे घराणे हे मूळचे खोत होत. त्याकाळी जे खोत होते ते शेतसारा जमा करायचे काम करीत. खोतगीरी असतांना त्यांची आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती
चांगली होती. कालांतराने घरची परिस्थिती बेताची झाली. शामची आई मेहनत करुन राबराब राबायची..धड कपडालत्ता ना जगण्यास पुरेसा पैसा..तरी देखील आईने शामला संस्कारांनी घडवीले. मानवतेच्या वाटेने जाणारे पथीक श्यामने व्हावे यासाठी लहानपणी भित्रा असलेल्या शामला धीट बनविले. साने गुरुजी मृदू हृदयाचे होते. दुसर्‍याला लागलेली ठेस ते आपली समजून त्यांची काळजी घेत. परक्याची वेदना आपल्या ममतेने मिटविणारा शाम मायाळू होता. त्याला दुसर्‍याचे आसू येतांना पाहता आले नाही. आपल्या अश्रृतून कारुण्याची सरिता निर्माण करणारा हा थोर कवी म्हणजे साने गुरुजी..कुणाच्याच वाटेला येऊ नये असे दु:ख ते झेलत आले. शिक्षण घेण्यासही पैसा अडका नसतांना मामाकडे शिकायला जाणारा शाम तेथील वातावरण न आवडल्याने त्याला दापोलीच्या शाळेत लहानपणी शिक्षण घेतले. आई म्हणजे ज्ञानाचा सागर त्याला जो प्राशन करेल तो आईचे प्रेम मिळवू शकेल.जिथे वेदना आहे तिथे
साकल्याची मूर्ती ही असते. जिथे अश्रृ पाझरतात तिथे प्रेमाचा झरा आटत नाही. आई कशी असावी याचे सुंदर उदाहरण शामची आई होती. मुलाचे लाड करायची परंतू कर्माला प्रथम प्राध्यान्य देणारी आई..शामला धाडसी करण्यासाठी आईने त्याला पोहायला इतरांकडून शिकविले. आई ही मृदु हृदयी होती. मुलांच्या मनावर मानवतेचे संस्कार करणारी आई यशोदा साने गुरुजींना लाभली होती. पुण्यात औंध संस्थेत शिक्षण घेण्यासाठी शाम गेला. त्याला काम करत शिकावे लागले. पुणे येथे बी. ए केले. मराठी व संस्कृत विषयाची त्यांना आवड होती. मराठी भाषा त्यांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून महत्ता सांगत होती. एम. ए पर्यंत शिक्षण झाल्यावर ते घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरी शोधत होते. अशा स्थितीत प्रताप ज्ञान मंदिरात जागा असल्याचे कळले गुरुजी अमळनेर नगरीत आले. अमळनेर च्या हया वस्तीगृहात गुरुजींनी मुलांचे भावविश्व फुलविले. कृतीयुक्त ज्ञानाचा महामेरु विद्यार्थ्यांना लाभला होता. अनेक विद्यार्थी ज्ञान व जीवनाचे धडे घेऊन पुढे गेली. स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती. साने गुरूजींनी महात्मा फुले यांचे भाषण ऐकले आणि ते प्रभावित झाले. फैजपूर येथील कांग्रेस च्या अधिवेशनानंतर त्यांनी स्वत ला स्वातंत्र संग्राम मध्ये झोकुन घेतले. अमळनेर चे उत्तमराव व लिलाताई यांना घेत भूमिगत राहिले. अमळनेर नगरी आपल्या सुंदर, अप्रतिम देशभक्ती च्या गीतांनी पुलकित केली. अनेक विद्यार्थी ह्या नगरीत गुरूजींचे शिष्य होते. साहित्याची आवड असलेला हा गुरूजी स्वातंत्र्य चळवळ सोबत साहित्य लिहित राहिला. एकुण 73 पुस्तके त्यांनी लिहून साहित्य जगत अक्षरांनी सुंदर केले. पुस्तके लिहतांना विनोबा भावे सारख्या कर्मयोगी व्यक्तीचे सानिध्य लाभले.गुरूजींना आपली आई सोडून गेल्यावर खूप दुःख झाले. सदोदित श्वासा इतके प्रेम करणारी आई आता मिळणार नाही याचा विरह जाणवला. गुरूजींनी कम्युनिस्ट विचाराचा अभ्यास केलेला होता. त्यामुळेच त्यांनी सेवा दलाची स्थापना केली. सदविचारी माणसे घडविण्याचा अथक प्रयास केला. सर्व संस्कृती गुण्यागोविंदाने रहाव्यात अशी गुरूजींची मनोकामना होती. त्यासाठीच आंतरभारतीची स्थापना केली. आपले सरकार आल्यावरही शेतकरी, कष्टकरी, समाज सुखी होत नाही हे पाहुन ते व्यथित झाले. अतिशय हळवे, संवेदनशील होते. मनात सदैव हित चितंनारा हे गुरूजी देशाची दुर्दशा पाहू शकत नव्हते. देशात बंधुभाव नांदण्याचे त्यांचे स्वप्न होते. गुरूजी देशासाठी लढले अमर हुतात्मा झाले ऐवढेच म्हणता येइल..

एस. एच. भवरे
उपसंपादक
लेखनमंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *