1 min read

डी.आर.कन्या शाळेत गीता  ज्ञान मंडळातर्फे भगवद्गीतेच्या बाराव्या अध्याचे पठण

Loading

डी.आर.कन्या शाळेत गीता  ज्ञान मंडळातर्फे भगवद्गीतेच्या बाराव्या अध्याचे पठण

अमळनेर दिनांक २३ डिसेंबर गीताज्ञान मंडळा तर्फे डी. आर.कन्याशाळेत गीतेचा बारावा अध्याय पठण करून घेतला. पटनासोबत गीतेचा स्पष्ट व शुद्ध उच्चार व्हावा यासाठी तीन ते चार दिवसांपासून गीता ज्ञान मंडळाचे सदस्य प्रयत्न करीत आहेत.सुरुवातीला आलेल्या सर्व सदस्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी यांनी स्वागत केले. त्यानंतर योगिनी बिऱ्हाडे, मानसी साळी, कावेरी महाजन यांनी गीतेचा बारावा अध्याय म्हटला. त्यानंतर शाळेच्या सर्व विद्यार्थीनींनी अध्याय म्हटला. नंतर स्वरांगी पाठक, प्राजक्ता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्  प्रा.रमेश बहूगुणे,प्रा.सतीश सोनार प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त केले.माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.गीता ज्ञान मंडळाच्या उर्मिला अग्रवाल, ममता अग्रवाल,ज्योती जोशी, मीना शर्मा यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थिनींना गीतेचे शुद्ध उच्चार सांगितले. मुख्याध्यापिका यांनी गीता मुखोतगत म्हणनाऱ्या सर्वांचा सत्कार केला.जेष्ठ शिक्षिका एस पी बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी जे व्ही बाविस्कर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा शिक्षक डि एन पालवे यांनी तर आभार शिक्षिका पी पी जोशी यांनी  मानले. गीता पठणा नंतर सर्व विद्यार्थीनिंना लाडू वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षिकांनी कार्यक्रम यशस्वीततेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *